परभणी येथे मिठाई वाटप करून मंडल दिन उत्साहात साजरा

0 77

परभणी येथे मिठाई वाटप करून मंडल दिन उत्साहात साजरा

परभणी : पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी ७ ऑगस्ट १९९० रोजी मंडल आयोग लागू करण्याची घोषणा केली. १३ ऑगस्ट १९९० ला मंडल आयोगाची अंमलबजावणी होऊन ५२% ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण लागू करण्यात आले. त्यामुळे ७ ऑगस्ट हा दिवस देशभरामध्ये मंडल दिन म्हणून साजरा केला जातो . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये 340 कलम घालून ओबीसींना आरक्षणाची तरतूद करण्यासाठीचा मार्ग खुला केला. याच आधारावर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काका कालेलकर आयोग नेमला होता. या आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या नाही. त्यामुळे पुढे पंतप्रधान मोरार्जी देसाई यांनी मंडल आयोगाची घोषणा केली. बिहारचे मुख्यमंत्री बिंदेश्वरी प्रसाद मंडल हे या आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांनी भारताच्या ४५० जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण करून आपला अभ्यासपूर्ण रिपोर्ट १९८० ला सादर केला .या आयोगाच्या शिफारशी तब्बल १० वर्ष धूळखात पडल्या होत्या .त्यानंतर ७ ऑगस्ट १९९० रोजी व्ही. पी. सिंग यांनी हा आयोग लागू करण्याची घोषणा संसदेत केली. ओबीसींना 27 टक्के आरक्षण मिळाल्यामुळे त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रात प्रतिनिधित्व दिसू लागले. ओबीसींना हक्काचे आणि मानाचे स्थान मिळू लागले. ओबीसी समाजावर दुरगामी परिणाम करणाऱ्या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘मंडल दिन’ साजरा केला जातो .या दिनाचे औचित्य साधून भारतीय पिछडा (ओबीसी) संघटन तसेच महात्मा फुले समता परिषद याच्या वतीने महापुरुषांना अभिवादन आणि पेढे वाटपाचा कार्यक्रम ७ ऑगस्ट 2023 रोजी आयोजित करण्यात आला . परभणी येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले. बी.पी मंडल अमर रहे” विश्वनाथ प्रताप सिंग यांचा विजय असो”, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा विजय असो महात्मा फुले यांच्या विचारांचा विजय असो ‘छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा विजय असो ‘ अश्या घोषणांनी परिसर दुमदुमला. सर्व कार्यकर्त्यांना व सामान्य लोकांना पेढे वाटप करण्यात आले …!! त्यानंतर छञपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. ओबीसी समाज अखंड हरिनाम सप्ताह साजरा करतो त्याप्रमाणे दरवर्षी 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट हा मंडल सप्ताह साजरा केला पाहिजे. तर मंडल लढाई च्या विचारांचा अग्नी तेवत ठेवण्याचे आवाहन केले. त्यानंतर महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. सर्व ओबीसी समाजाच्या वतीने महापुरुषांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रमाची सांगता झाली.

याप्रसंगी भारतीय पिछडा ओबीसी संघटन चे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील जाधव, उपाध्यक्ष एन.आय. काळे, प्रा. तुकाराम साठे, कृष्णा कटारे, इंजिनिअर साहदू ठोंबरे, ऍड. आर.एन. गायकवाड, ऍड. स्वराज्य सिंग परिहार, कैकाडी समाज महासंघाचे अध्यक्ष डी.के. जाधव, आनंद बनसोडे, विष्णुभाऊ थोरात, शेषराव थोरात, अर्जुन काळे , बंडू मेहञे, अविनाश काळे, प्रकाश समीनदरे, प्रकाश इंगोले, अशोकराव पूंड, राजेश बालटकर, राहुल उबाळे विजय हारकळ, विश्वनाथ कोक्कर,मालकर, ऍड. सांगळे , कृष्णा घुले ,
बळी चव्हाण ईत्यादी मान्यवर उपस्थितीत होते. डॉ. सुनील जाधव यांच्या पुढाकारातून आयोजन करण्यात आले होते

Leave A Reply

Your email address will not be published.