छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त सेलु (परळी) येथे संभाजी ब्रिगेड शाखा उद्घाटन व भव्य रक्तदान शिबिर संपन्न

0 78

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त सेलु (परळी) येथे संभाजी ब्रिगेड शाखा उद्घाटन व भव्य रक्तदान शिबिर संपन्न

“मराठा भवन” संदर्भात मराठा सेवा संघाने पुढाकार घ्यावा – सेवकराम जाधव

परळी (वार्ताहर) : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेलु (परळी) येथे संभाजी ब्रिगेड शाखा उद्घाटन व भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बालासाहेब सपकाळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष इंजिनियर संजय नाना देशमुख, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष ईश्वर सोनवणे, माजी तालुका अध्यक्ष राजेश ठोंबरे, परळी शहराध्यक्ष संदीप काळे, शहर सचिव राजेश पवार, सामाजिक कार्यकर्ते गीतारामजी सोनवणे, विष्णुपंत सोनवणे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, उपाध्यक्ष पांडुरंग मोरे, शहराध्यक्ष विश्वंभर मोरे, शहर उपाध्यक्ष गणेश मस्के हे होते. या शाखा उद्घाटन व रक्तदान शिबीराच्या प्रसंगी मान्यवरांचे मनोगत व्यक्त झाले या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव यांनी संबोधित करत असताना परळी येथील मराठा भवन जागे संदर्भात मराठा सेवा संघाने पुढाकार घेऊन मार्ग मोकळा करावा जेणे करून “मराठा भवन” विषयी राजकारण होणार नाही. जेणे करून परळी तालुक्यातील व शहरातील मराठा समाजाच्या अनेक समस्या सुटतील तसेच परळी तालुका व शहरातील मुला,मुलींसाठी वस्तीग्रहाची संकल्पना असून यासाठी लवकरात लवकर मराठा सेवा संघाने पुढाकार घेऊन मार्ग मोकळा करावा. असे मत जाधव सर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष इंजिनीयर संजय देशमुख यांनी मराठा सेवा संघ युगनायक पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या विचाराला अपेक्षित असं तरुणांनी काम करून प्रगती साधावी, तसेच तालुकाध्यक्ष ईश्वर सोनवणे, शहराध्यक्ष संदीप काळे यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी शाखाध्यक्ष शाखेतील पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना संभाजी ब्रिगेडचे ध्येय धोरण शंभर टक्के राजकारण – शंभर टक्के समाजकारण या अनुषंगाने काम करावे तसेच स्वतः निर्व्यसनी राहून स्वतः सोबत कुटुंबाची काळजी घेणे गावासाठी काय योगदान आपल्या पदाच्या माध्यमातून देता येईल याकडे विशेष लक्ष देणे, शासनाच्या योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवून त्याचा गावासाठी गावातील लोकांसाठी उपयोग करून घ्यावा शेतकऱ्याचे प्रश्न, गावातील प्रश्न यावरती शाखा पदाधिकाऱ्यांनी काम करावे. याप्रसंगी अठ्ठावीस रक्तदात्यानी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली या कार्यक्रमासाठी आयोजक संभाजी ब्रिगेड शाखा अध्यक्ष व्यंकटेश शंकर बदले, उपाध्यक्ष पांडुरंग मनोहर सातपुते ,सचिव बालाजी सुभाष सातपुते, कार्याध्यक्ष पांडुरंग देवराव सातपुते ,कोषाध्यक्ष पवन भारत सातपुते, संघटक गोविंद भागवत सातपुते, शाखेचे सदस्य विष्णु संतराम सातपुते, श्रीराम आश्रुबा सातपुते, अनिल रामभाऊ सातपुते, वैभव माणिक सातपुते, सोमेश्वर संदिपान सातपुते ,सुदाम वैजनाथ सातपुते, गणेश वसंत सातपुते ,मधुसूदन रामदास सातपुते, शुभम गणेश कदम तसेच या कार्यक्रमासाठी गावातीलभरत सातपुते,आनंत सातपुते , मारवतराव सातपुते, निवृत्ती मुळे, बालासाहेब सातपुते, किसन मोरे, उप सरपंच धमानंद बचाटे, अच्युत सातपुते,शिध्देश्वर घोडके, दता बदाले, मुरलीधर सटाले, लक्ष्मण सातपुते,अर्जुन सातपुते, दत्ता बचाटे, मधुसूदन महाराज सातपुते,मंचक सातपुते,गणेश सातपुते, अतुल साळवे,समाधान ताटे,बळीराम घोडके,देविदास सातपुते,अप्पाराव सातपुते,शिवाजी चौधरी ,दगडुबा सातपुते,नामदेवराव सातपुतए नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन सातपुते यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार दत्तात्रय बदले यांनी मानले या कार्यक्रमासाठी गावातील तरुण वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.