ब्राम्हणवाद्यांना दर्गाह का नको आहेत ? 

0 279

ब्राम्हणवाद्यांना दर्गाह का नको आहेत ?

 

नितीन सावंत परभणी
9970744142

 

सुफी संत आणि भारतीय समाजव्यवस्था

अक्ल आमद दीन ओ दुनिया शुद खराब l
इश्क आमद दर ओ आलम कामयाब ll
– सिद्ध सूफी संत रूमी

जातीव्यवस्था ही चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या अंतानंतर जन्माला आलेली अपरिहार्यता आहे.म्हणजे एक व्यवस्था संपल्यानंतर दुसरी निर्माण होणे साहजिकच आहे.जातीव्यवस्था बुद्धाच्या वर्णांताच्या क्रांतीनंतर बुद्धाच्या समोरच काही संघगणांत उदयास येत होती.स्त्रीसत्ताक गणव्यवस्थेत द्विवर्ण राज्यव्यवस्था म्हणजे क्षत्रिय (समस्त स्त्रीवर्ग) आणि ब्रह्मण (समस्त पुरुषवर्ग).पुढे नांगराच्या शोधानंतर मातृवंशक राजक संघगणात त्रैवर्ण्यवस्था जन्माला येते.ती क्षत्रिय,ब्रह्मण आणि दासांची होती. पुढे मात्र ती चातुर्वर्ण्य धारण करते ती दासप्रथाक पितृसत्ताक राजर्षी संघगणांत ब्राम्हण,क्षेत्रीय,वैश्य आणि शुद्र या स्वरूपात.या चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या उदरातच जातीव्यवस्था आकार घेत होती असे वरील विवेचन केल्यानंतर कॉ शरद पाटील यांनी केलेले आहे.
पुढे जातीव्यवस्था निर्मिती नंतर ती विकासाच्या म्हणजे घट्ट होण्याच्या चरणटोकावर पोहंचते ती ११ व्या १२ व्या शतकात.याच काळात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील संत आणि बाहेरून आलेले किंवा येथेच इस्लाम स्विकारलेले सुफीसंत या जातीव्यवस्थेला कडाडून विरोध करतात आणि जन्मावर आधारलेला भेदभाव,उचनिचपना ते नाकारतात. म्हणून तुम्हाला जत्रा,उरुसांत भेदभाव आणि जातीयता दिसनार नाही.सुफीनी आणि संतांनी जातीव्यवस्था आणि अस्पृश्यतेच्या कट्टर असण्याच्या काळातही तिला विरोध केला होता.

पुर्वी उच्चजातीयांच्या गल्ली बोळांत आणि वस्त्यांमध्ये अस्पृश्य आला तर कसुन चौकशी होई की तु इकडे कुणीकडे ?
पन यात्रा,जत्रा,उरुस या उत्सवांमधे मात्र अस्पृश्यांसाठी मुक्त संचार होता.भेद नाही किंवा दबाव दडपण नाही.काही ठिकाणी तर अस्पृश्यांना खास मान सन्मान होता.जसे यात्रेतील देवीची पहिली पुजा मातंगस्त्रीच्या हस्ते होई.सोलापूर सिद्धरामेश्वर मंदिरात सात पैकी मुख्य दोन नंदिध्वजाचा मान मातंगांना असतो.यामुळे सामाजिक सर्वहरांना आर्थात माजी अस्पृश्य जाती व आदिवासी जमातींना ह्या यात्रा उत्सव उरुस अत्यंत जिव्हाळ्याचे सन्मानाचे केंद्र होते.उरुस आणि जत्रा हे सामाजिक आणि आर्थिक सर्वहरांचेच जमण्याची ठिकाणे आहेत.येथे आलीकडे शिकलेले मध्यमवर्गीय फारसे दिसनार नाहीत.

म्हणून जिथे भेदाभेद न करता माणूस म्हणून मानसन्मान मिळत असे तिथे सामाजिक सर्वहरातील सर्वाधीक जाती आकर्षित झाल्या आणि त्यांनी यात्रा उत्सवांना मोठे स्वरूप आनले.

काहींनी तर या सुफींच्या माणुसकीच्या प्रचाराला आकर्षित होऊन इस्लाम स्विकारला.पन इस्लामात मुर्तीपुजा नाही किंवा आल्लाचे मंदिर बांधता येत नाही म्हणून आपन ज्यांच्याकडून इस्लामची दिक्षा घेतली किंवा ज्यांच्याकडून इस्लाम समजून घेतला असे सुफी गेल्यानंतर लोकांनी त्यांच्या आदरापोटी जत्रा उरुस संदली सुरु केल्या.पुढे नॉन मुस्लिम लोकांनी सुद्धा आपलीच एक भाऊबंदकी इस्लामत गेलेली आहे म्हणून त्या भाऊबंदकीसाठी संदली वगैरे काढल्या,जेवणावळ्या घातल्या.यातून सलोखाच जपला गेला.काहींना हे सुफी बाबा जीवंत असताना त्यांच्याकडील जुडीब्युटींच्या द्वारे दुर्धर रोगावर इलाज झाला.त्यामुळे त्या नॉन मुस्लिमांनी बाबांचे कृतज्ञता सोहळे म्हणून या संदली चालु ठेवल्या.एकंदरीत हे सर्व जोडनारे एकात्म आहे.टाकाऊ निरुपद्रवी नाही.नकारात्मक ब्राम्हणी अंधश्रद्धा निर्मूलन समीती व नकारात्मक पुरोगामी संघटना हे अजूनही समजून घेता आलेले नाही.कारण नास्तिकवादाची पाश्चिमात्य धारणा होय.

सूफीजींनी येवून या देशात ब्राम्हणांच्या पुरोहीतशाहीला अप्रत्यक्ष का होइना शह द्यायला सुरुवात केलेली होती.सतीप्रथेला विरोधाची सुरुवात सुफींच्या प्रचारातुनच झालेलेली होती.

बरे कोन होते हे सुफी ?

सुफी हा माणुसकीचा प्रचार करणाऱ्या लोकांचा एक प्रकार.जसे झेन,ताओ,भिख्खू,संत,संता तसे सुफी.सुफी म्हणजे असे लोक की ज्यांच्यापासुन कुनालाही काहीही उपद्रव होनार नाही.उलट हे लोक ज्यांच्या राज्यात,गावात किंवा सहवासात येतील त्यांच्यापासून सर्वांना फायदाच होइल.मानवी जीवन सुखकर होइल असा माणुसकीचा संदेश देनारे हे सुफी होत.भारतात सुफी संतांचे फार मोठे प्रस्थ होते.ज्यांच्या शाखा प्रत्येक ग्रामीण भागापर्यंत पोहंचलेल्या आहेत.याचे साक्षीपुरावे प्रत्येक शहरात असनारे दर्गे आजही देत आहेत.हे आमच्यात यत नाही,हे आम्हाला मान्य नाही म्हणून मुस्लिम वर्गाने आलीकडे या दर्गांकडे पाठ फिरवली आहे.आणि हे जोडनारे दुवे उजेडात आनले तर आपले राजकारण यशस्वी होनार नाही म्हणून राजकीय मंडळी या माणुसकीच्या प्रचारकांवर मेहरबान व्हायला तयार नाहीत.अशा कात्रीत सापडलेल्या सुपाऱ्या म्हणजे सुफी संत होत.

यांनी काय काय कामे केली
१)रुग्नांच्या जखमा धुतल्या,त्यांच्यावर औषधोपचार केले.त्यांच्यासोबत जेवन केले.
२) अस्पृश्यता आणि जातीव्यवस्था कोण्या देवाने बनवलेली नाही हे निर्भयपणे सांगितले.आणि ती मोडीत काढण्यासाठी निडरपणे काम केले.

३)कुठलेही कपडे घालण्याचे आणि कोनतेही अन्न ग्रहन करण्याचे समान अधिकार सर्वांना असतात हे सांगितले.

४)भिन्न संस्कृती,भिन्न जातीधर्मातील लोकांचे हे दुवे बनले.सामंजस्य शिकविले,राबविले.

५) निस्वार्थी साधे जीवन जगले.राजेमहाराजांनी दिलेले उपहार भेटी नाकारल्या.सर्वसामान्यांसारखे जगले वागले.म्हणून ते लोकप्रिय झाले.

हे सुफी इतके लोकप्रिय बनले की यांना घरातील सदस्याप्रमाणे बाबा म्हणायचा प्रघात रुढ झाला.
या सुफीचे किस्से गमतीजमती अत्यंत मजेशीर आहेत.ज्या ज्या गावात यांचे दर्गे आहेत तेथील मुस्लिम पुजाऱ्यांना गावातील बैल पोळ्याचा किंवा काही सणांचा मुख्य मान असतो.या सुफींचे प्रचारक आजही मोरपंखी पेंढी घेवून तुम्हाला सर्वत्र भटकताना दिसतात.लुंगी धारण केलेल्या दक्षीण भारतीय वेशभूषेत ते असतात.

या देशात जनावर बनलेल्या ब्राम्हणी गुलाम वर्गाला सुफी संतांनी पहिल्यांदा माणुसकी शिकवली.दुसऱ्या हिन अस्पृश्य लेखु नका म्हणून सांगितले.म्हणून ते ग्रामीण भागापर्यंत लोकप्रिय राहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.