टेंभुर्णी येथे बहुजन मुक्ती पार्टीतर्फे परिवर्तन यात्रेचे आयोजन

0 66

टेंभुर्णी येथे २५ मे रोजी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे परिवर्तन यात्रेचे आयोजन

 

टेंभुर्णी (प्रतिनिधी) : टेंभुर्णी येथील बहुजन मुक्ती पार्टीचे मिशन २०२४ साठी परिवर्तन यात्रेचे आयोजन २५ मे २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय टेंभुर्णी, तालुका माढा येथे सायंकाळी पाच वाजता करण्यात आले आहे.

सदर परिवर्तन यात्रा ही पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे, अशी माहिती बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष महेंद्र सोनवणे यांनी दिली आहे.

बहुजन मुक्ती पार्टीच्या महिला विभागाच्या वतीने परिवर्तन मेळावा यशस्वी करण्यात आला होता. तरी २५ मे रोजी होणाऱ्या राज्यव्यापी परिवर्तन यात्रेसाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन पार्टी टेंभुर्णीच्या वतीने करण्यात येत आहे.

परिवर्तन यात्रेतील मुख्य विषय मतदान ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्यावे, ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, एमएसपी गॅरंटी कायदा लागू करावा, आदिवासी विस्थापन बंद करा, शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करा, अन्न वस्त्र निवारा ३६५ दिवस गॅरंटी द्या, अल्पसंख्यांक महिला वरील प्रतिबंधक कायदा कडक करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, घरकुल योजनेसाठी पाच लाखाचा निधी देण्यात यावा, गायरान घरांचे अतिक्रमण कायमस्वरूपी करावे, पोलीस कर्मचारी आठ तास ड्युटी करावी, शेतकऱ्यांना वीज मोफत द्यावी यासह अनेक इतर विषयासाठी परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी आरपीआयचे सचिन खरात, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अँड. राहुल मखरे, पश्चिम महाराष्ट्राचे समीक्षा प्रभारी नानासाहेब चव्हाण, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता काकासाहेब जाधव, महासचिव आर आर पाटील, जिल्हाध्यक्ष तुकाराम राऊत, प्रमोद कुटे, वैभव महाडिक, दत्तात्रय देवकर, अमोल खंदारे, पत्रकार संतोष वाघमारे, अनिल आरडे, मदन कांबळे, रहीम तांबोळी याचबरोबर अनेक जण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.