राखेच्या प्रदूषणाने त्रस्त दादाहरी वडगाव येथील नागरिकांचे थर्मल गेट समोर मागच्या ४ दिवसापासून चालू असलेल्या आमरण उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीर पाठिंबा

0 21

राखेच्या प्रदूषणाने त्रस्त दादाहरी वडगाव येथील नागरिकांचे थर्मल गेट समोर मागच्या ४ दिवसापासून चालू असलेल्या आमरण उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीर पाठिंबा

– दादाहरी वडगाव येथील नागरिकांच्या मागण्या मान्य करून आमरण उपोषण तात्काळ सोडवा अन्यथा वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करण्यात येईल : तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज

परळी (वार्ताहर) : मागच्या ९ ऑक्टोबर पासून दादाहरी वडगाव येथील राखेमुळे त्रस्त नागरिकांचे आमरण उपोषण चालू आहे त्या उपोषणाला तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाठिंबा दिला व उपोषणकर्त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. परळी येथे पावर स्टेशनमुळे राखीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण असून दादाहरी वडगाव येथील नागरिक अतोनात हैरान झाले असून नागरिकांच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. दादाहरी वडगाव येथील नागरिकांनी वेगवेगळे आंदोलन मागच्या अनेक वर्षापासून केले आहेत पण प्रशासनाने कुठल्याही पद्धतीची दखल घेतली नाही. त्यामुळे मागच्या 9 ऑक्टोबर पासून दादाहरी वडगाव येथील नागरिक आमरण उपोषणाला बसले आहेत या गावातील पाच जण आमरण उपोषण व उर्वरित गाव हे साखळी उपोषणाद्वारे आंदोलनामध्ये दादाहरी वडगाव येथील उपोषणातील मागण्या पुढील प्रमाणे आहेत 1) राखेच्या बंधार्‍यातील बेकायदेशीर राख उपसा त्वरित थांबवून कायमस्वरूपी बंद करण्यात यावा. 2) परिसरातील राखेच्या ढिगार्‍याची त्वरित विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ करण्यात यावा 3) सामाजिक उत्तरदायित्व योजने अंतर्गत दादाहरी वडगाव येथील नागरिकांना शुद्धपाणी, आरोग्य सुविधा रस्ता 24 तास वीजपुरवठा त्वरित करण्यात यावा 4) सामाजिक उत्तरदायित्व योजनेअंतर्गत भुसावळ ,कोराडी, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र बाधित गावातील उमेदवाराकरिता दादाहरी वडगाव येथील युवकांना प्रशिक्षण योजना सुरू करण्यात यावी. 5) राख मिश्रित पाणी नाल्यामध्ये येत आहे ते बंद करण्यात यावे किंवा त्याचे व्यवस्थापन करण्यात यावे. या पाच मागण्यासाठी दादाहरी वडगाव येथील गावकरी आमरण उपोषणाला बसले आहेत त्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पाठिंबा दिला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, शहराध्यक्ष ॲड जीवन देशमुख, युवक तालुका अध्यक्ष शंकर शेजुळ, तालुका उपाध्यक्ष भागवत गीते ,युवक तालुका उपाध्यक्ष वृक्षराज काळे, सामाजिक कार्यकर्ते बाबा शिंदे, युवक नेते सोमनाथ भोसले, गोविंद काळे, महादेव काळे, यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व दादाहरी वडगाव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.