नांदेड,छ.संभाजी नगर (औरंगाबाद),नाशिक सह इतर ठिकाणी औषधामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये मदत द्या व परळी ग्रामीण रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध करा I.N.D.I.A. घटक पक्षाची निवेदनाद्वारे मागणी

0 28

नांदेड,छ.संभाजी नगर (औरंगाबाद),नाशिक सह इतर ठिकाणी औषधामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये मदत द्या व परळी ग्रामीण रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध करा I.N.D.I.A. घटक पक्षाची निवेदनाद्वारे मागणी

 

परळी (वार्ताहर) : राज्य शासनाच्या बेजबाबदारीमुळे नांदेड, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नाशिक सह इतर अनेक ठिकाणी औषधा अभावी शेकडो रुग्ण मृत्यू पावले असून त्या‌ रुग्णांच्या नातेवाईकांना प्रतिकी दहा लाख रुपये द्या तसेच परळी ग्रामीण रुग्णालयासह इतर राज्यातील रुग्णालयामध्ये औषध व्यवस्था आणि आवश्यक मशनरी डेफिनेशन नियुक्ती करा अशी मागणी I.N.D.I.A .आघाडी घटक पक्षाच्या वतीने बीड जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली असून परळी येथे I.N.D.I.A घटक पक्ष्यांच्या वतीने आज बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे पुढील प्रमाणे मागण्या केले आहेत
1) नांदेड संभाजीनगर औरंगाबाद नाशिक येथील आरोग्य विभागाच्या निष्काळजी मुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रतीके दहा लाख रुपये मदत म्हणून तात्काळ द्यावी 2) मृत्यूला कारणीभूत असलेल्या वर चौकशी करून सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. 3) उपजिल्हा रुग्णालय परळीत असणाऱ्या सर्व मशनरी कार्यान्वित कराव्यात व सर्व तपासण्यासाठी लागणाऱ्या अध्यावत मशनरी उपलब्ध करून द्याव्यात 4) उपजिल्हा रुग्णालय परळी या अंतर्गत सर्व रुग्णालयातील टेकनिशियन व आवश्यकतेनुसार अनुसरून सर्व डॉक्टर कर्मी व इतर कर्मचारी भरती करावी 5) परळी शहरात डेंगूसह इतर आजारांची प्रचंड वाढ झाली आहे त्यावर नियंत्रणासाठीच्या सर्व उपयोग उपाययोजनांची पूर्तता तात्काळ करण्यात यावी 6) प्रस्तुती व इतर सर्व आजारावर उपजिल्हा रुग्णालय परळी येथे उपचार करण्याची पुरेपूर व्यवस्था करावी आवश्यकता नसताना रुग्ण रेफर केले जाऊ नयेत 7) परळी तालुक्यातील तहसील कार्यालय अंतर्गत सर्व रिक्त कार्यालयीन प्रमुख आवश्यक जागा भरण्यात याव्यात. या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे I.N.D.I.A घटक पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे या निवेदनावर सी पी आय एम चे राज्य कमिटी सदस्य काँग्रेस घाडगे सर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज, शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष सय्यद हनीफ उर्फ बहादूर भाई ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष ॲड जीवन देशमुख, शिवसेना शहर प्रमुख राजेश विभुते, सीपीआयजी सचिव मंडळ कॉम्रेड पांडुरंग राठोड, सीपीआयजीएम सचिव ॲड अजय बुरांडे, काँग्रेस विधानसभा अध्यक्ष रणजीत देशमुख, परळी शहर प्रमुख परमेश्वर गीते ,काँग्रेस गंगाधरजी पोटभरे, माकपा तालुका सचिव कॉम्रेड भगवानराव बडे, राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष रमेश ढाकणे, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष भागवत गीते, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष महबूब कुरेशीष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक शहराध्यक्ष सय्यद फिरोज, काँग्रेस परळी शहराध्यक्ष ॲड शशिकांत चौधरी, युवक तालुका कार्याध्यक्ष शुभम नागरगोजे, किसान सभा जिल्हा सेक्रेटरी मुरलीधर नागरगोजे, कॉम्रेड विशाल देशमुख ,कॉम्रेड विष्णुपंत देशमुख, कॉम्रेड बनसोडे,शिवसेनेचे युवक नेते अतुल शिंदे, विकी देशमुख यांसह I.N.D.I.A .घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.