लोकशाहीला झोपवित असलेल्या मोदींना झोपवा – लोकशाही वाचविण्यासाठी समविचारी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येण्याचे अ‍ॅड. सरोदे व डॉ. चौधरी यांचे आवाहन

ज्यांचे शिक्षण कुठे व किती झाले? त्याचे सर्टिफिकेट कुठे आहे? हे माहित नाही ते लीडर म्हणून घेत आहेत. ते आदरणीय आणि कंपनीचे लीडर आहेत. आज सगळीकडे लीडरची कमतरता भासत असून उद्योजकांचे मोठे लीडर म्हणून मोदी काम करीत आहेत.

0 69

लोकशाहीला झोपवित असलेल्या मोदींना झोपवा
– लोकशाही वाचविण्यासाठी समविचारी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येण्याचे अ‍ॅड. सरोदे व डॉ. चौधरी यांचे आवाहन

धाराशिव : ज्यांचे शिक्षण कुठे व किती झाले? त्याचे सर्टिफिकेट कुठे आहे? हे माहित नाही ते लीडर म्हणून घेत आहेत. ते आदरणीय आणि कंपनीचे लीडर आहेत. आज सगळीकडे लीडरची कमतरता भासत असून उद्योजकांचे मोठे लीडर म्हणून मोदी काम करीत आहेत. त्यामुळे लोकशाही वाचविण्यासाठी समविचारी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र आले पाहिजे. विशेष म्हणजे लोकशाहीला झोपवित असलेल्या मोदींना झोपवा असे थेट आवाहन करीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर अ‍ॅड. असीम सरोदे व डॉ. विश्वंभर चौधरी यांनी हल्लाबोल करीत दि.३ मार्च रोजी धो-धो धुतले.
छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर द्वेषमुक्त समाज आणि माणुसकीसाठी निर्भय बनो. दडपशाहीच्या विरोधात, लोकशाही रक्षणासाठी. निर्भय बनो कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. विश्वंभर चौधरी, उत्पल चंदावर, बाळकृष्ण निढाळकर, अ‍ॅड श्रेया आवले आदी उपस्थित होते. पुढे बोलताना अ‍ॅड सरोदे म्हणाले, मोदी यांनी गेल्या १० वर्षात एकही नवीन योजना जनतेच्या हितासाठी आणली नाही. मात्र धर्माबद्दल व मंदिर-मस्जिद याबद्दल दररोज बोलले जाते. हिंदू-मुस्लिम असा वाद निर्माण करून समाजासमाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम करत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. त्यांनी लोकशाहीची मोडतोड सुरू केली असून हे रोखण्यासाठी राजकीय पुनर्वसन झाले पाहिजे, असे अ‍ॅड सरोदे यांनी सांगितले. तसेच फोडा आणि राज्य करा या नितीचा अवलंब करुन दुसºयाचा पक्ष बेईमानीने हिसकावून घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी यांनी यवतमाळ येथील सभेवर ५० कोटी रुपयांचा खर्च करून तेथील जनतेला काय दिले? असा प्रश्न करीत छत्रपती शिवाजी महाराज असते तर मोदींचा कडेलोट केला असता असे ते म्हणाले. यावेळी अ‍ॅड सरोदे यांच्यासह सर्वांचा तुळजाभवानीने परिधान केलेले महावस्त्र व तुळजाभवानी मातेच्या पायांचे कुंकू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी अत्यंत उद्धट राजकारण केले असा आरोप केला. तसेच २०२४ ची निवडणूक मोदी विरुद्ध बेरोजगारी, महागाई अशीच असून कोणत्याही परिस्थितीत मोदी यांना हरवावेच लागेल असे आवाहन अ‍ॅड सरोदे यांनी केले.
महाराष्ट्र ही संतांची भूमी मग उत्तर प्रदेशातील बुवाला का बोलावता ? डॉ. विश्वंभर चौधरी
लोकशाही आणि संविधान वाचवायचे असेल तर मोदी आणि शहाला हरवायचे आहे. तुमचा राम आणि आमचा राम यामध्ये फार मोठा फरक आहे. आमच्या देवात आणि धर्मात दलालांची गरज नाही असे सुनावत महाराष्ट्र ही संतांची भूमी असताना उत्तर प्रदेशातील बुवाला तुम्ही का बोलावता असा थेट प्रश्न डॉ. विश्वंभर चौधरी यांनी मोदी व भाजपच्या मंडळींना विचारला. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले नसते तर कोणी शिकले नसते. मात्र सध्या महिलांसाठी सगळ्यात वाईट कालखंड असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आरक्षण समितेसाठी आहे. मात्र आरक्षणावरुन देश अराजकतेकडे नेण्याचा सगळा प्रकार चालू असून राष्ट्रपित्याला गोळी घातली, राष्ट्रगीताला बंदी घातली, वंदे मातरमला व राष्ट्रध्वजाला भाजपने विरोध केला. असे असताना दुसरीकडे राष्ट्रप्रेम शिकविण्याचे नकली ढोंग करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी यांच्या नेतृत्वाखाली ७ देशांची परिषद झाली त्याचा गौवा मोठ्या प्रमाणात केला. मात्र तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी १०० देशांची शिखर परिषद घेतली. पण त्यांनी त्याचा गवगवा केला नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. विशेष म्हणजे उद्योजकांना २५ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. मात्र शेतकºयांना १ रुपयांची देखील कर्जमाफी दिली नसल्यामुळे देशाचे आदानीकरण करून टाकले असल्याचा आरोप त्यांनी केला. तर शेतकºयांच्या खात्यावर वर्षाला १२ हजार रुपये टाकतात आणि त्यांचे ३० हजार रुपये खातात असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षात मोदी यांनी एकही जनतेच्या हिताची योजना आणली नाही मात्र मनमोहन सिंग यांच्या काळात राष्ट्रीय अन्नसुरक्षा, भूमी अधिग्रहण केलेल्या शेतकºयांना चारपट रक्कम, मनरेगा, वनाधिकार, शिक्षणासाठी आरटीआय अशा अनेक योजना आणल्याचे त्यांनी आर्वजून नमूद केले.
फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील कीड
फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला कीड लावली असून ते गद्दार लोकांना साथ देत तर आहेतच. मात्र फडणवीस हे केवळ चिंचाळणारे नेते आहेत असा आरोप करीत ते गद्दारांना डोक्यावर घेत असल्याचा आरोपही अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केला.
गुवाहाटीमध्ये कोणत्या नेत्याने विनयभंग केला?
गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये त्या दोन आमदारांना कोणी मारहाण केली? व एअर होस्टेसचा लिफ्टमध्ये कोणत्या नेत्याने विनयभंग केला? असा सवाल उपस्थित केला. याचा मागवा घेतला तर शिंदे सरकारमधील मंत्र्याच्या खुर्च्या हल्ल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.