नागपूर ते गोवा जाणारा शक्तीपीठ महामार्र्ग रद्द करावा – महाराष्ट्र राज्य किसान सभेची निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

0 15

नागपूर ते गोवा जाणारा शक्तीपीठ महामार्र्ग रद्द करावा
– महाराष्ट्र राज्य किसान सभेची निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

परभणी : नागपूर ते गोवा जाणारा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केला असून नुकतेच एमएसआरडीसीने हवाई सर्वेक्षण देखील पूर्ण केले आहे. या रस्त्यासाठी सुमारे ८६ हजार कोटी रूपयांची गुंतवणूकीचा आराखडा रस्ते विकास महामंडळाने बनविला आहे. या रस्त्यासाठी महाराष्ट्र महामार्ग कायदा १९५५ या कालबाह्य कायद्याच्या आधारे भूसंपादन करण्याचा शासनाचा व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा इरादा आहे. या महामार्गामुळे मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील कलावे उध्दवस्त करीत हा महामार्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील १ लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन कायमची कोरडवाहू बनणार आहे. त्यामुळे हा महामार्ग तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले की, या व्यावसायिक महामार्गावर ट्रॅक्टर, बैलगाडी, रीक्षा इत्यादी वाहने चालवण्यात येणार नसल्याने तसेच कोणताही सर्व्हीसरोडची सुविधा नसल्याने कोणताही उपयोग शेतकºयांना होणार नाही. उलट ४० हजार एकर जमीन कवडीमोल दराने ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यामुळे या विरोधात गावोगावी किसान सभेच्या शाखा शासनाच्या नाटिफिकेशन विरोधात रस्त्यावर येतील. याउलट मराठवाड्यातील प्रचलित असलेल्या रस्ते दुरूस्तीसाठी विशेष निधी मंजूर करावा. सर्व गावांना बारमाही डांबरी रस्ते जोडण्यासाठी निधी द्यावा असे या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर कॉ. राजन क्षीरसागर, दयानंद यादव, मितेश सुक्रे, नितीन सागर, शेख अब्दुल, त्र्यंबक वैरागर, संतोष यादव, अंगद यादव आदिंच्या स्वाक्षºया आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.