चौदा वषार्पासून पुस्तके धुळख्यात पडल्याचा धक्कादायक प्रकार – सांगवी भादेव येथील काशीरामजी सार्वजनिक वाचनालय कारभार चव्हाट्यावर

0 6

चौदा वषार्पासून पुस्तके धुळख्यात पडल्याचा धक्कादायक प्रकार
– सांगवी भादेव येथील काशीरामजी सार्वजनिक वाचनालय कारभार चव्हाट्यावर

मुखेड : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध वेगवेगळे पुस्तके कथा, कादंबºया वाचता यावेत नवीन माहितीचे ज्ञान प्राप्त व्हावे, त्यांच्यात वाचन क्षमता दृढ व्हावी याकरिता शासनाने वाचनालयाची निर्मिती केली आहे. मात्र या वाचनालयातील शेकडो कथा, कादंबºया, पुस्तके, मासिके, नियतकालिके, ही मागील चौदा वषार्पासून धुळख्यात पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मुखेड तालुक्यातील सांगवी भादेव येथे असलेल्या काशीरामजी सार्वजनिक वाचनालय हे मागील १४ वषार्पासून एका बंदिस्त खोलीमध्ये बंद दाराच्या कपाटात शेकडो पुस्तके वाचकांचे धुळख्यात पडली आहेत. व ही बाब मनाला लाजवेल अशी आहे.
या वाचनालयामध्ये मागील १४ वषार्पासून एकही वाचक जात नाही. या वाचनालयाचे संचालक व्यंकट काशीराम रेनगुंटवार हे असून ते व्यवसायाने मुखेड तालुक्यातील बाराहाळी येथे एका निवासी विद्यालयात सहशिक्षक म्हूणन कार्यरत आहेत. सांगवी भादेव या वाचनात संपूर्ण भोंगळ कारभार असून केवळ कागदोपत्री घोडे नाचवुन या वाचनालयाचे मालक व्यंकट रेंगूटवार हे शासनाकडून दिले जाणारे लाखो रुपयाचे अनुदान लाटण्याचं काम जोमाने करीत आहेत. असा आरोप ही ग्रामस्थांनी केला आहे. विशेष व धक्कादायक बाब म्हणजे व्यंकट रेंनंगुटवार यांच्याकडे एकूण ३ वाचनालय असून ते सावरगाव, सांगवी भादेव, व मनसखरगा येथे आहेत. असे सांगवी भादेव येथे असलेल्या काशीराम सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपालांनी सांगितले.

मुख्य हेतूला हार्ताळ फासण्याचे काम

सांगवी भादेव येथील तरुण व प्रोढ व्यक्तींना वाचनाचा छंद खूप मोठ्या प्रमाणात आहे. वाचनालय चालकाच्या मनमानी कारभारामुळे, व वाचकास चुकीच्या पद्धतीने वागणूक मिळत असल्यामुळे या वाचनालयात गावातील विद्यार्थी, तरुण, ज्येष्ठ नागरिक कोणीही जात नसल्याने शासनाच्या वतीने चालू केलेल्या मुख्य हेतूला हार्ताळ फासण्याचे काम वाचनालय संचालकांकडून केले जात आहे. व वाचनालय ही केवळ नावापुरतीच उरली आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाºयांनी अशा वाचनालयाची मान्यता रद्द करावे. अशी मागणी गावकºयांनी केली आहे.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.