भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर मराठा समाजाचा रोष – गाव भेट दौºयानिमित्त गावात जाणाºया मुंडेंचा गावातून युटर्न

0 24
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर मराठा समाजाचा रोष
– गाव भेट दौºयानिमित्त गावात जाणाºया मुंडेंचा गावातून युटर्न
बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर आंदोलन उभं केले आहे. या आंदोलनाचा फटका लोकप्रतिनिधींना बसताना दिसत आहे. यानंतर सरकारने विशेष अधिवेशन मागवून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं. मात्र, मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एकाही राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात प्रवेश करू न देण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे. याचा फटका बीड लोकसभेच्या संभाव्य उमेदवार पंकजा मुंडे या शिरूर कासार तालुक्यातील गाठी भेटी घेत असताना मराठा समाजातील लोकांनी त्यांनी गावातून हाकलून दिल्याने त्यांना युटर्न घ्यावा लागल्याचा एक व्हीडिओ व्हायरल होताना दिसत आहे.
मनोज जरांगे यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून राज्य सरकारने त्यांची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली असल्याने मराठा समाजात संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गावांच्या वेशीवरच मराठा समाजाने बॅनर लावून पुढाºयांनी प्रवेश करू नये असं लिहिलं आहे. याचा फटका आतापर्यंत अनेक पुढाºयांना बसला आहे. आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना वेशीतूनच परत पाठवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संवाद दौºयाच्या निमित्ताने शिरूर कासार तालुक्यातील गाठी भेटी घेत असताना बीडच्या खलापुरीमध्ये मराठा समाज बांधवांकडून विरोध करण्यात आला. परिणामी पंकजा मुंडे यांना कार्यक्रम रद्द करून पुढे जावं लागलं. पंकजा मुंडे यांच्या गाडीसमोर मराठा समाजाने आंदोलन करत घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी सावरासावर करत मराठा बांधवांना समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर मराठा समाजाने माघार घेतली नाही. अखेर पंकजा मुंडे यांना वेशीतूनच माघारी परतावे लागले.
Leave A Reply

Your email address will not be published.