राम, कृष्ण यांना खून व महिलांशी गैरवर्तन प्रकरणी तुरुंगात टाकलं असते : प्रा. विक्रम हरिजन – हरिजन यांच्यावर कठोर कारवाई करण्याची हिंदू संघटनांची मागणी

0 182

राम, कृष्ण यांना खून व महिलांशी गैरवर्तन प्रकरणी तुरुंगात टाकलं असते : प्रा. विक्रम हरिजन
– हरिजन यांच्यावर कठोर कारवाई करण्याची हिंदू संघटनांची मागणी

 

लखनौ : अलाहाबाद विद्यापाठीचे असिस्टंट प्राध्यापाक डॉ. विक्रम हरिजन यांनी राम आणि श्रीकृष्ण यांचेवर सोशल मीडियावर केलेले विधान हिंदुत्ववादी संघटनांकडून वादग्रस्त ठरविण्यात येऊ लागल आहे. या प्राध्यापकावर प्रयागराज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. विक्रम हरिजन यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक हिंदू संघटनांनी केली आहे.

प्राध्यापक डॉ. विक्रम हरिजन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्यात त्यांनी राम आणि श्रीकृष्णावर विधान करताना म्हणतात की, आज प्रभू राम असते तर ऋषी शंभुकाचा खून केल्याबद्दल आयपीसीच्या ३०२ अंतर्गत तुरुंगात टाकलं असतं. तसेच कृष्ण असते तर महिलांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यांनाही तुरुंगात टाकलं असतं, असा मजकूर लिहित पोस्ट शेअर केली आहे. रविवार दि. २२ ऑक्टोबर रोजी त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे. प्रा. विक्रम हरिजन यांच्या या पोस्टमुळे हिंदूत्ववादी संघटनांमध्ये वादग्रस्त पोस्ट म्हणत आरोळी ठोकली जात आहे. या प्रकरणी विक्रम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचा पोटसुळ
राम आणि श्रीकृष्णावर पोस्ट लिहिणारे डॉ. विक्रम हरिजन हे अलाहाबाद विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत. ते मध्यकालीन इतिहास शिकवत असून ते या विद्यापीठात असिस्टंट प्राध्यापक आहेत. त्यांनी केलेल्या पोस्टमुळे विश्व हिंदू परिषद, हिंदू जागरण मंच आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या पोटसुळ उठताना दिसत आहे. यानंतर हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कर्नल गंज पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच लिखीत तक्रारही नोंदवली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलिसांनीही विक्रम यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

विधानावर ठाम : डॉ. विक्रम हरिजन
आपण केलेल्या आपल्या विधानावर आपण ठाम असल्याचे डॉ. विक्रम हरिजन यांनी म्हटले आहे. मी इतिहासाचा शिक्षक आहे. पुस्तके वाचतो. पुस्तक वाचूनच मी ती पोस्ट लिहिली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

तपास सुरू : पोलीस निरीक्षक गोविंद यादव
विक्रम यांनी सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी या तिन्ही संघटनांची मागणी आहे. तर, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या तक्रारीनंतर आम्ही गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे, असे कर्नलगंज पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोविंद यादव यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.