मराठा आरक्षण विषयी परळीत बेमुद्दत साखळी उपोषणास सुरुवात

0 11

मराठा आरक्षण विषयी परळीत बेमुद्दत साखळी उपोषणास सुरुवात

 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे याविषयी सुरु असलेल्या उपोषण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी परळी वैजनाथ येथील सकल मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर गुरुवार पासून बेमुद्दत उपोषण सरू करण्यात आले आहे.

परळी तालुक्यातील अनेक गावातून मराठा आरक्षण संदर्भात साखळी उपोषण, ठिय्या आंदोलन, धरणे आंदोलन यसह वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन सुरू आहेत. बऱ्याच गावांमधून राजकीय पुढार्‍यांना प्रवेश बंदी केल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार दि.२६ ऑक्टोबर २०२३ रोजी मा.उपविभागीय अधिकारी परळी वैजनाथ यांना निवेदन देत बेमुद्दत साखळी उपोषण सुरु केले असून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ करण्यात येत असलेले हे बेमुद्दत साखळी उपोषण आरक्षण मिळाल्या शिवाय थांबवणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.
बेमुदत साखळी उपोषण आंदोलना दरम्यान कॅण्डल मार्च,पाठिंबा मोर्चा, समाज प्रबोधन असे विविध उपक्रम राबवले जाणार असून परळी तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील मराठा समाजातील सामाजिक – राजकीय – शैक्षिणीक – प्रसार माध्यम – कामगार संघटना – व्यापारी – उघोजक – तरुणांसह सर्वच क्षेत्रातील समजबंधवांकडून मोठ्याप्रमाणावर पाठींबा मिळत असल्याचे दिसून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.