राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाही, ती राष्ट्रीय कट रचणारी संघटना – काँग्रेस नेते गोविंद सिंह यांचा आरएसएसवर हल्लाबोल

0 141

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाही, ती राष्ट्रीय कट रचणारी संघटना
– काँग्रेस नेते गोविंद सिंह यांचा आरएसएसवर हल्लाबोल

 

भोपाळ : मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते गोविंद सिंह यांनी गुरूवार दि़ १४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला़ यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाही, ती राष्ट्रीय कट रचणारी संघटना आहे़ आरएसएस म्हणजे राष्ट्रीय कट रचणारी संघटना आहे, असे म्हणत नरेंद्र मोदी हे लहानपनापासून या संघाचे कार्यकर्ते आहेत असा टोला लगावूल समाचार घेतला.
भारत आघाडी म्हणजे अहंकारी आघाडी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते यावर बोलताना काँग्रेस नेते गोविंद सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धुलाई केली़ यावेळी सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने कट रचायला शिकवले आहे़ आरएसएस हा अफवा पसरवणारा समाज आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याचे ट्रेंड वर्कर आहेत़ मोदी जे बोलतात यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे़.


भारत आघाडी म्हणजे अहंकारी आघाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागर जिल्ह्यातील बिना येथे आयोजित केलेल्या सभेला संबोधित करताना विरोधी भारत आघाडीवर हल्लाबोल करताना अहंकारी आघाडी म्हटले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.