ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर भारताच्या चांद्रयान 3 चे अवशेष ?

0 59

ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर भारताच्या चांद्रयान 3 चे अवशेष ?

 

Chandrayaan 3 काही दिवसांपूर्वी भारताच्या इस्रोकडून चांद्रयान ३ चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं हा महत्त्वपूर्ण क्षण होता. जगाच्या पाठीवर अंतराळ क्षेत्रात भारताचं नाव उंचावणाऱ्या या चांद्रयान मोहिमेकडून अनेक अपेक्षा ठेवल्या जात असतानाच ऑस्ट्रेलियातून काही अशी दृश्य समोर आली यामुळे नव्या चर्चा समोर येत आहेत.

चांद्रयान ३ चे प्रक्षेपण झाल्यानंतर काही दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियातील समुद्र किनाऱ्यांवर जे काही दिसले ते पाहून प्रत्येकजण हैराण झाला. ती साधारण दोन मीटर वर्तुळाकार धातूची गोष्ट होती, ज्यावर अनेक तारा अडकल्या होत्या. ही वस्तू पाहताना ऑस्ट्रेलियातील पोलिसांचेही धाबे दणाणले. प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार सध्या पोलिसांनी लष्कराशी संपर्क साधून, तपास हाती घेतला आहे. काहींच्या मते हा भारताच्या चांद्रयान ३ च्या अवशेषांचा एक भाग असू शकतो. त्यामुळे आता तपासातून समोर येणाऱ्या अंतिम निरीक्षणाकडेच सर्वांचे डोळे लागले आहेत.

किनाऱ्यांवर सापडलेल्या या वस्तूचा तपास आता ऑस्ट्रेलियातील अंतराळ संशोधन संस्थेनं हाती घेतला असून त्यासंबंधीची माहिती देत अंतराळ संशोधन संस्थेच्या माध्यमातून एक फोटोही शेअर करण्यात आला. प्राथमिक माहिती आणि निरीक्षणांनुसार हे अवशेष एखाद्या परदेशी स्पेस लाँचच्या अवशेषांशी संबंधित असावेत असाही अंदाज वर्तवण्यात आला. परिणामी आपण जागतिक स्तरावर काही संस्थांच्या संपर्कात असल्याचंही स्पष्ट केलं.

अनेक अंदाज आणि तर्कवितर्कांच्या आधारे अंदाज लावायचा झाल्यास ही विचित्र वस्तू आणि ते अवशेष PSLV च्या रॉकेटशी संबंधित आहे. पण, चांद्रयानाशी त्याचा संबंध नसू शकतो ही एक बाजू. कारण आहे ते म्हणजे त्यावर असणारे बार्नाकल अर्थात काही समुद्री जीव. हे जीव समुद्रात्या तळाशी असतात. ते कोणत्याही गोष्टीवर जमण्यास साधारण तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यामुळं हे अवशेष पीएसएलव्हीचे असले असं म्हटंल तरीही चांद्रयान 3 शी त्याचा संबंध नसू शकतो. तर काही अहवालानुसार हे अवशेष PSLV रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्याचे अवशेष असू शकतात. जेव्हा एखादं रॉकेटच लाँच होतं तेव्हा तेव्हा ते विविध टप्प्यांतून पुढे जातं. रॉकेट जसजसं उंचावर जाऊ लागतं तसतसं त्याचं वजन आणखी हलकं करण्याच्या हेतूनं त्याचे काही भाग वेगळे होतात. जिथं दोन प्राथमिक टप्पे प्रक्षेपणाच्या ठिकाणापासून दूर असणाऱ्या एखाद्या समुद्रात पडतात तर तिसरा भाग हा ऑस्ट्रेलियाच्या जवळ पडण्याची शक्यता असते.

Leave A Reply

Your email address will not be published.