भाजप खा. किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शिवसेनेकडून दिली फाशी 

0 372

भाजप खा. किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शिवसेनेकडून दिली फाशी 

 

अमरावती : विरोधकांवर आरोप करून त्यांच्यी चौकशी करण्याची मागणी करणारे भाजपचे खा. किरीट सोमय्या यांचा अश्लिल व्हिडिओ माध्यमांनी प्रसारित केल्यानंतर भाजपच्या सुसंस्कृतपणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आज आहे. शिवसेनेच्या वतीने किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शहरातील उड्डाण पूलाला फाशी देऊन निषेध केला.

शिवसेनेच्या वतीने किरीट सोमय्या यांना उड्डाणपुलावर लटकवून किरीट सोमय्या मुर्दाबाद म्हणत त्यांचा निषेध केला. यावेळी उपस्थित महीलांनी यावेळी किरीट सोमय्या व भाजपच्या बेगडीपणाचा पर्दाफाश केला. यावेळी भाजप म्हणजे सुसंस्कृत पक्ष म्हणून जगात जगजाहीर केला गेला पण कालच्या व्हिडिओमधून त्याचा हा सुसंस्कृतपणा जाहीर झाला आहे. दुस-या पक्षातील नेत्यांवर बोलणा-या चित्रा वाघ आता कुठे आहेत ? भोकात गेली का चित्रा वाघ ! सोमय्या यांचा अश्लिल व्हिडिओ बघून त्यांना यावर काही बोलावेसे वाटत नाही का. कालपासून या सोमय्याचा नंगानाच पुर्ण महाराष्ट्र पाहतो आहे यावर चित्रा वाघ काहीच का बोलत नाहीत असाही प्रश्न उपस्थित महीलांनी केला.

भाजपमधील सोमय्या यांचा व्हिडिओ बघून भाजपच्या नेत्यांना अजूनही लाज वाटत नाही. भाजपमध्ये गेलेला प्रत्येकजण धुतल्या तांदळासारखे कसे होतात. भाजपने जो कुत्रा लोकांवर बोलण्यासाठी सोडला होता त्याचा नंगानाच पाहताना लाज वाटते असेही महीला म्हणाल्या.

यावेळी उपस्थित पुरुष आंदोलकांनी ही आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, किरीट सोमय्या नावाच्या हरामखोर माणसाने या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावला. जे फडणवीस हुशारकीच्या गोष्टी करतात त्यांनी जो कलंक लावला तोच कलंक किरीट सोमय्या यांनी लावला आहे. सोमय्यांच्या कलंकला भाजप कोणत्या वाॅशिंग पावडरने स्वच्छ करते, जे हरामखोर नेते आहेत ते सर्व भाजपमध्ये घेतले जात आहेत. सोमय्यावर कोणता गुन्हा नोंद केला जाणार आहे, यांची चौकशी कोण करणार, फडणवीस यात नेमकी कोणाची चौकशी करणार आहेत असा प्रश्न विचारला.

Leave A Reply

Your email address will not be published.