खामगाव शहरातील रस्त्याची दुर्दशा – झोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग कधी येणार ग्रामस्थांचा सवाल

0 94

खामगाव शहरातील रस्त्याची दुर्दशा

– झोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग कधी येणार ग्रामस्थांचा सवाल

 

खामगाव : शहरातील जीएस काॅलेज ते ड्रिमलँड शिटी जलंब रोड रस्त्याचे काम मागिल आठ दहा महिन्यांपासून रखडले आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना कसरत करावी लागत असून पैदल जाणा-या प्रवाशांना धुळीचा त्रास होत आहे. या रस्त्याचे काम तात्काळ सुरू व्हावे यासाठी सामाजिक संघटनांनी अनेकवेळा आंदोलने केली मात्र झोपेचं सोंग घेऊन पडलेल्या प्रशासनाला यांचे काहीच गांभीर्य दिसत नाही.
या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोणी ठेकेदार देता का ? अशी आर्त हाक सध्या ग्रामस्थांकडून होताना दिसत आहे. यासाठी वाडी गावच्या नागरिकांनी तीन महिन्यांपूर्वी रस्तारोको केल्यामुळे केवळ आश्वासन देऊन एक बुजगावणे रुपी ठेकेदार उभा करून काम सुरु झाले. पण ते काम अर्धवट सोडून ठेकेदार पसार झाला तो कायमचा, यामुळे ठेकेदार शोधणाराला बक्षीस देऊ अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. हा ठेकेदार कशामुळे अर्धवट काम सोडून गेला ? कोणाची टक्केवारी मिळत नसल्याने काम अर्धवट सोडले असे प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहेत.
या रस्त्याच्या आजूबाजूला राहणारे स्थानिक रहिवाशी, हॉटेल व्यावसायिक, मोटार वाहन चालक या धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या धुळीमुळे आजाराचे प्रमाण वाढले असून याला जिम्मेदार असणा-या प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. खामगाव शहरात राजणा-या सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांनी ही या रस्त्याकडे न बघण्याचा ठेका घेतल्यामुळे सामान्यांचे हाल होत आहेत, यावर तात्काळ तोडगा निघावा अशी मागणी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.