संभाजी ब्रिगेड मधून रविंद्र पाटील यांची हकालपट्टी – पक्षाच्या आदेशाचे पालन न केल्याचे कारण समोर

0 3,362

संभाजी ब्रिगेड मधून रविंद्र पाटील यांची हकालपट्टी

– पक्षाच्या आदेशाचे पालन न केल्याचे कारण समोर

 

ठाणे : संभाजी ब्रिगेडचे ठाणे पालघर येथील पदाधिकारी रविंद्र पाटील यांनी पदाच्या आदेशाचे पालन न केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.  पाटील यांनी यानंतर पक्षाचा लोगो किंवा नावाचा वापर करू नये असेही पत्रकाद्वारे संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष योगेश पाटील यांनी लेखी ताकीद दिली आहे.

संभाजी ब्रिगेड ठाणे पालघर येथे विभागीय सचिव पदावर असणारे रविंद्र पाटील हे पक्षाच्या पुढील कार्याच्या आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकांना वारंवार गैरहजर राहत असल्याचे विभागीय अध्यक्ष योगेश पाटील यांनी आपल्या पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. त्यासोबतच ते अनेक वेळा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड या संघटनांवर व मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, इतिहास संशोधक एम. एम. देशमुख, डाॅ. आ. ह. साळूंके यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार गरळ ओकणा-या लोकांबरोबर पक्ष आणि संघटनेच्या विचारांना तिलांजली देत त्यांचे अंतर्गत संबंध जोपासत असल्याचे मध्यंतरी उघड झाले होते.

यासोबतच ते संभाजी ब्रिगेड मध्ये घडलेल्या तरुणांना इतर संघटनांची जबाबदारी देऊन ते संघटन विरोधी काम करत असल्याचे संभाजी ब्रिगेड मधील काही कार्यकर्त्यांनी विभागीय अध्यक्ष योगेश पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले होते. यामुळे योगेश पाटील यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून रविंद पाटील यांची हकालपट्टी करून पक्ष संघटनेचा लोगो न वापरण्याच्या सुचना दिल्या आहेत. यानंतर जर रविंद्र पाटील यांनी संभाजी ब्रिगेडच्या लोगो व नावाचा वापर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी तंबी या पत्रकाद्वारे दिली आहे.

रविंद्र पाटील यांचेकडून कार्यकर्त्यांचे मानसिक खच्चीकरण

यापुर्वी अनेक वेळा ठाणे पालघर विभागीय सचिव पदावर असलेले रविंद्र पाटील यांनी संघटनेतील अनेक मुली व कार्यकर्त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे अनेकवेळा पक्षश्रेष्ठींकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारींचा योग तो विचार झाल्याचे मत संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते गणेश काकड यांनी व्यक्त केले.

महिलांचा रिस्पेक्ट न देणा-या व्यक्तिला संघटनेमध्ये ठेवू नये

जो व्यक्ति संघटनेमधल्या मुलींचा, महिलांना रिस्पेक्ट देत नाही, अशा व्यक्तिला संघटनेमध्ये ठेवू नये, अशी भुमिका संभाजी ब्रिगेडमधील महिला कार्यकर्त्यां सुजाता शेळके यांनी  मांडली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.