आंबेडकरवादी संघटनेकडून एबीव्हीपी कार्यकर्त्यांच्या पृष्ठभागावर फटके – दोन्ही गटांकडून परस्पराविरोधात गुन्हे दाख

0 345

आंबेडकरवादी संघटनेकडून एबीव्हीपी कार्यकर्त्यांच्या पृष्ठभागावर फकटे

– दोन्ही गटांकडून परस्पराविरोधात गुन्हे दाखल

 

छत्रपती संभाजीनगर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भितींवर ठिकठिकाणी ‘एबीव्हीपी’ ही इंग्रजी अक्षरे रातोरात रंगविण्यात आल्याचे समोर आले. एवढेच नाही तर महात्मा फुले – डॉ. आंबेडकर विचारधारा व संशोधन केंद्र या नावाच्या पाटीवर देखील फुले आंबेडकर नावावर ‘एबीव्हीपी’ असे लिहिण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त झालेल्या आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मंगळवार दि. १७ आक्टोबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विद्यापीठ परिसरातील उपहारग्रहात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पृष्ठभागावर फटके देऊन चोप दिला.  उपहारग्रहा  बेदम चोप दिला. या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पराविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गेले असून पोलिसांकडून पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागांच्या भिंतीवर ‘एबीव्हीपी’,’जॉईन एबीव्हीपी’असे शब्द लिहिण्यासाठी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतला जात आहे. त्यावर आंबेडकरी संघटना, एसएफआयसह इतर संघटनांनी आक्षेप नोंदवत लक्ष दिले. यानंतर विद्यापीठ परिसराचे विद्रुपीकरण केल्यामुळे संबंधितांवर कारवाईची मागणीही करण्यात आली. ‘एबीव्हीपी’,’जॉईन एबीव्हीपी’ ही अक्षरे १३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री लिहिण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर सलग दोन दिवस सुट्या असल्यामुळे त्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. परंतू १६ ऑक्टोबर रोजी एसएफआयसह इतर विद्यार्थी संघटनांच्या वतीने कुलगुरूंना निवेदन देत विद्यापीठाचे विद्रुपकरण करणाऱ्या अभाविपच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. विद्यापीठ प्रशासनाने वाद वाढण्याची चिन्हे पाहून स्वतःहून जेवढ्या ठिकाणी ‘एबीव्हीपी’ अशी अक्षरे लिहिण्यात आली होती ती सर्व पांढरा रंग लावून पुसून टाकली.

‘महात्मा फुले-डॉ. आंबेडकर विचारधारा व संशोधन केंद्रा’च्या नावावर ‘एबीव्हीपी’ असे लिहिल्यामुळे आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून तिव्र संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे १० ते १५ कार्यकर्त्यांनी मंगळवार रोजी दुपारी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील उपहारग्रहात चहा पित बसलेल्या अभाविपच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र यावेळी झालेल्या बाचाबाचीत अभाविपच्या पदाधिकाऱ्यांना बेदम चोप देण्यात आला. तेव्हा अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य इमारतीच्या दिशेने पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला. एबीव्हीपीवर तात्काळ कारवाईची मागणी करत उद्या विद्यापीठात शैक्षणिक बंदचे आवाहन रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी, रिपब्लिकन बहुजन सेना, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.