परळी-सिरसाळा रस्त्याच्या चालू बोगस कामाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रस्ता रोको आंदोलन प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित

0 12

परळी-सिरसाळा रस्त्याच्या चालू बोगस कामाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रस्ता रोको आंदोलन प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित

 

परळी ( प्रतिनिधी) : परळी सिरसाळा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 एफ रस्त्याच्या बोगस कामाविरोधात सोमवार दि.16 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता टोकवाडी येथे रस्ता रोको आंदोलन प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिली.

परळी सिरसाळा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या चालू आहे. या कामात नदीपात्रातील दगड गोट्याचा वापर केला जात आहे. जो मुरूम वापरला जात आहे. त्यामध्ये मोठे मोठे दगड वापरले जात आहेत. जुना डांबरी रस्ता उरून त्यातील निघाले डांबराचे गठ्ठे त्या रोडवर वापरले जात आहेत. मुरमाचे काम चालू असलेल्या ठिकाणी दिवसातून कमीत कमी चार वेळा पाणी टाकण्यात यावे, नालीचे काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे. यासह रोडच्या कामाची नियमित क्वालिटीची चाचणी तपासणी करण्यात यावी तसेच कामामध्ये अनियमितता असून अत्यंत बोगस व निष्कृष्ट दर्जाचे काम चालू होते. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने लेखी आश्वासन देऊन ज्या कामावर आक्षेप घेण्यात आला आहे ते काम विशेष लक्ष घालून व्यवस्थित व उत्कृष्ट क्वालिटीचे करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. प्रशासनाच्या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवून हे आंदोलन स्थगित केले असले तरी या बोगस कामाच्या विरोधातील लढाई संपलेली नाही या कामाकडे आम्ही विशेष लक्ष देऊन हे काम चांगल्या क्वालिटीचे करून घेण्याची नागरिक या नात्याने आमची जिम्मेदारी असून जर अशा निष्कृष्ट दर्जाचे काम निदर्शनात आले तर यापुढे वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही या प्रसंगी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, तालुका उपाध्यक्ष बबनराव काळे, युवक तालुका अध्यक्ष शंकर शेजुळ, युवक तालुका उपाध्यक्ष वृक्षराज काळे, युवक तालुका कार्याध्यक्ष शुभम नागरगोजे, परळी शहर कार्याध्यक्ष महबूब कुरेशी, ज्येष्ठ नेते बाबा शिंदे, किरण पवार, सुनील सोळंके, युवक नेते सोमनाथराव भोसले, सोमनाथराव मुंडे, भगवानराव कदम, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष अक्षय सोनवणे,नितीन भोसले, पिंटू जाधव, प्रथमेश कावरे, बबलू घोबाळे, सचिन काळे, अशोक काळे ,महादेवराव काळे, आकाश जाधव, गोविंद काळे, बाळासाहेब रुपनर, सर्जेराव गडदे, महारुद्र कदम यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.