संभाजी ब्रिगेडचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना स्मरण पत्र

0 141

संभाजी ब्रिगेडचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना स्मरण पत्र

 

 

वाशिम : लाखो रुपयांची उधळपट्टी करून बांधलेली जिजाऊ सभागृहाची इमारती निर्जन व ओसाड बनली आहे, ही इमारत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला – मुलींच्या लग्न समारंभासाठी मंगल कार्यालय म्हणून निःशुल्क उपलब्ध करुन द्यावी या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेड वाशिमच्या वतीने यापुर्वीच दिले होते. मात्र त्यावर प्रशासनामार्फत कोणताही निर्णय न झाल्याने आज परत एकदा संभाजी ब्रिगेड वाशिमचे जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना स्मरण पत्र दिले.

शहरातील जिल्हा परीषद परिसरातील जिजाऊ सभागृहाची इमारत सध्या धुळ खात पडली आहे. ही इमारत बांधण्यासाठी शासनाचे अर्थातच जनतेचे लाखो रुपये खर्च झाले होते. ती जिजाऊ सभागृहाची इमारत आज निर्जन व ओसाड बनली आहे. त्यामुळे जनतेच्या लाखो रुपयांचा अपव्यय झाला आहे. सदर इमारत ही आपल्या वाशीम जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्न समारंभासाठी मंगल कार्यालय म्हणून निःशुल्क उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दि. २८ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनात केली.
सदर इमारतीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिजनांना व्यवसायाचे प्रशिक्षण देणारे केंद्र सुरु करावे, त्यावर प्रशासनाच्या वतीने कोणतीही कार्यवाहीस सुरुवात केली नसेल तर तातडीने उचित कार्यवाही करावी अन्यथा जनतेच्या पैशातून बांधलेले सदर जिजाऊ सभागृह जनतेच्या सेवेत रुजू झाले नाही. संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी भिम जन्मोत्सव या जिजाऊ सभागृहात साजरा करू असा इशारा देखिल संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रशासनाला देण्याला आला.
जिजाऊ सभागृहाचा सार्वजनिक कार्यासाठी उपयोग करण्यात यावा यासाठीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी वासिम यांना देतेवेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे, जिल्हा सचिव शेख ईसाक, जिल्हा प्रवक्ता विकास देशमुख, विद्यार्थी आघाडीचे इस्माईल पठाण, तालुकाध्यक्ष अजय गवारगुरु, इजाज शेख, राहुल सोमटकर, प्रल्हाद पाटील, सिताराम व वाशिमकर साहेब आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.