मेंढ्यांच्या लेंड्या खाणा-या भक्तांनो जागे व्हा !

केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भरडला जाणारा शेतकरी बाळूमामांनेही देशोधडीला लावण्याचा विडा उचलला आहे का ?

0 1,445

मेंढ्यांच्या लेंड्या खाणा-या भक्तांनो जागे व्हा !

 

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
१. भट बोकड मोठा
२. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !
या पुस्तकाचे लेखक
repe9nat@gmail.com

 

“बाळूमामाची आध्यात्म शक्ती
अंधभक्तांनो खरंच पहा
मेंढरांचा खांड त्यांचा
ताडोबा जंगलात सोडून या !”
वरील ओळी या विद्रोही कवी विश्वंभर वराट यांच्या आहेत. यातून बाळूमामा व त्यांच्या मेंढ्यांना घाबरणा-या लोकांना थोडीसी उर्जा मिळते. अध्यात्म हे थोतांड आहे, ते लुटारूचं साधन आहे हे अनेकांनी पुरावे देऊन मांडलं आहे. पण आमचा बहुजन समाज वाचत नाही म्हणून तर सारा सत्यानाश आहे. म्हणून तर ‘भारत हा नव्वद टक्के मुर्खांचा देश आहे’ असं माजी न्या‌. काटजू म्हणाले होते, ते आज शंभर टक्के खरं आहे. कारण आमचा बहुजन समाज एवढा अंधश्रद्धेच्या आहारी गेला आहे की विचारताच सोय नाही. त्याच असं की, सध्या महाराष्ट्रात बाळू मामाच्या मेंढ्या फिरताना दिसत आहेत. या मेंढ्यांची शेतक-यांचं जीण मुष्किल केलं आहे. पण त्याविरोधात कोणता शेतकरी बोलला तर त्या मेंढ्यांच्या लेंड्या खाणा-या पिलावळी त्या शेतकऱ्याला भिती घालताना म्हणतात की, “भविष्यात वाईट घटना ऐकायला मिळणार, बाळूमामांची बकरी हाईत, आडवू नका वाईट घडलं” (लोकमत १५ फेब्रु. २०२३) तळहातावर आलेल्या फोडाप्रमाणे व पोटच्या लेकरांप्रमाणे जपलेल्या पिकात जर जनावर घुसू लागली तर शेतकरी त्याला आवडणार नाही का ? जर या बाळूमामाच्या मेंढरांना शेतक-यांच्या पिकाची नासाडीच करायची आहे तर मग बाळूमामा ट्रस्टने मोदी शहा कडून पडीक असलेली हजारो एक्कर जमीन घेऊन त्यावर बाळूमामाच्या मेंढ्यांचा अन् त्यांच्या लेंड्यांचा काय धुमाकूळ माजवायचा तो माजवावा त्याला आमची काहीच हारकत नाही. मात्र केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भरडला जाणारा शेतकरी बाळूमामांनेही देशोधडीला लावण्याचा विडा उचलला आहे का ? असेच वाटते. कारण उभ्या पिकात मेंढ्या फिरवून आणि निघालेल्या मालाला भाव न देऊन बाळूमामाच्या ट्रस्ट व राज्यसरकारला नेमकं साध्य तरी काय करायचे आहे ?

बाळुमामा ट्रस्टच्या मेंढरांचे कळप उभ्या पिकात घुसत आहेत. ‘मेंढरांचा कळप बाळूमामाचा हाय, आडवू नका न्हाईतर धोक्यात येशीला’ अशा भितीने ऊस, मका, शाळू व वैरणीसाठीच्या पिकांचा फडसा पडत आहे. अंधश्रद्धेपोटी उभे पीक खाणा-या मेंढरांच्या कळपांना साधे हाटकण्याचेही धाडस शेतकरी करताना दिसत नाहीत. त्यामुळे नुकतीच उगवण होत असलेली भुईमूग, मका व पुर्व मशागती पुर्ण झालेले ऊस या कळपांच्या भक्षस्थानी पडत आहेत. कथीत कहाण्यामुळे शेतकऱ्यांना हताशपणे पाहण्याशिवाय काहीच करता येईनासे झाले असून या विरोधात दाद मागायची कोणाकडे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कारभा-यांशी बोलतो आणि तळ उठवायला सांगतो म्हणत फोन बंद केला. (लोकमत १५ फेब्रु. २०२३) शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा हेतू उराशी बाळगून मोकाट मेंढर घेऊन फिरणा-या बाळूमामा ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशील भोसले शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव न ऐकताच फोन बंद करतात. म्हणजे हा ट्रस्ट शेतकरी आंदोलकांवर पाण्याचे फवारे मारणा-या भाजपाई बरोबर आहे ? कारण ट्रस्टला जर शेतकऱ्यांप्रती आपुलकी कनवळा असता तर ट्रस्टने असे मोकाट मेंढ्यांचे कळप लोकांच्या जिवावर जगवलेच नसते. शेतकरी त्यांच्या आयुष्यातून एकदाचा उठल्यासच गावागावात मोकाट फिरणारे मेंढ्यांचे कळप धैर्यशील भोसले उठवणार आहेत का ? मामाची मेंढर आडवल्यास जर शेत-यांसोबत बर वाईट होणार असेल तर शेतक-यांनी ह्या अंधश्रद्धेला खतपाणी न घालता ह्या मेंढ्यांचे कळप गावातून हुसकून लावले पाहीजेत. कारण बाळूमामा ट्रस्ट व लोकांच्या इच्छा पुर्ण करणा-या त्यांच्या मेंढ्यांचे गौडबंगाल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने “माणसापरास मेंढरं….?” या लेखात यापुर्वीच पार उघडे नागडे केले आहे, त्यामुळे कोणीही घाबरू नये. शेतकऱ्यांनो तुम्हाला ज्या मेंढ्यांची भिती दाखवून तुमच्या शेती व शेतातील पिकांची नासाडी केली जातेय त्या मेंढ्या दैवी शक्ती प्राप्त किंवा चमत्कारी नाहीत हे लक्षात ठेवा. कारण नाशिक जिल्ह्यातील मिरगाव येथे कारच्या अपघातात बाळू मामाच्या १२ मेंढ्यांचा मृत्यू झाल्यानंतर या परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत निषेध म्हणून रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली त्यावेळी सदरील घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढत रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला केला.
दरम्यान, मृत झालेल्या मेंढ्यांवर स्थानिक नागरिकांच्या मदतीने विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. (मटा १२ फेब्रु. २०२३) तुम्हाला ज्या मेंढ्यांची भिती दाखवली जातेय त्या मेंढ्या साधारण आहेत त्यामुळे त्यांना विनापरवाना आपल्या शेतात आणि आपल्या गावात घुसू देऊ नका. राधानगरी तालुक्यातील राशिवडे या गावातील नागरिकांप्रमाणे ग्रामपंचायत मध्ये बैठक घेऊन एखादा ठराव घ्या अन् शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या मेंढ्या अन् त्यांच्या ट्रस्टला धडा शिकवा.

अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे काही मनोरूग्ण बोंबलताना म्हणतात की, “बाळूमामांची मेंढर शेतकऱ्यांच्या पिकातून फिरवल्यास उत्पन्न दुप्पट होते.” पण चांगल्या पिकात मेंढर फिरवल्यास काहीच शिल्लक राहत नाही हे वास्तव असताना मग उत्पन्न दुप्पट कुठून मिळणार ? पण अंधश्रद्धेला बळी पडलेले शेतकरी भितीपोटी हा बुक्यांचा मार सहन करत आहेत. पण जर का एखाद्या शेतकऱ्यांने विरोध केलाच तर त्याची सोशल मिडियावरून बदनामी केली जात आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशिवडे ग्रामपंचायतीच्या एका बैठकीत बाळू मामाच्या मेंढ्यांचे कळप ताबडतोब गावातून हाकलायला सांगण्याबरोबरच पुर्वपरवानगीशिवाय पुन्हा गावात आणायचे नाहीत असे एकमतानी ठरले. या बैठकीला ग्रामपंचायतचे उपसरपंच व सदस्य उपस्थित होते. यावेळी गावचे पोलिस पाटील मा. उत्तम पाटील म्हणाले की, बाळूमामाच्या कळपाविषयी शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. याविषयी कस ट्रस्टच्या विश्वस्तांशी संपर्क साधला मात्र कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे स्वतः शेतकऱ्यांनी पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात. अंधश्रद्धेतून पिकांचे नुकसान होऊ देऊ नये. (लोकमत १५ फेब्रु. २०२३) राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावातील नागरिकांचे अभिनंदन करावेच लागेल कारण त्यांनी ह्या अंधश्रद्धेला खतपाणी न घालता बाळू मामाच्या मेंढ्या गावातून हाकालण्याचा व पुन्हा गावात मेंढ्या येऊ न देण्याचा एकमताने निर्णय घेतला. गावचे पोलिस पाटील यांनीही आपल्या गावकऱ्यांसोबत राहून गावचा पोलिस पाटील कसा असावा हे दाखवून दिले त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करावे लागेल. कारण मेंढ्यांच्या लेंड्या खाणा-यांच्या गावात एवढा मोठा निर्णय घेतला जातोय हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

बाळूमामाच्या मेंढरातील बोकड अमावस्येला दूध देते अस बाळूमामा ट्रस्ट म्हणाले होते, तेव्हा अंनिसने नागपुर येथिल पशुविज्ञान विद्यापीठाचे प्रशिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. एल. देवपूरकर यांच्याशी थेट फोनवर संपर्क करून खरी माहीती मिळवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी देवपूरकर यांनी, बोकडाने दूध देणे यामागचे विज्ञान स्पष्ट करत मी अंनिस सोबत आहे म्हणाले. त्यामुळेच अंनिसने ११ लाखाचे आव्हान बाबामामा ट्रस्टला दिले होते पण ते त्यांनी न स्विकारताच तेथून पळ काढला. त्यावेळी डाॅ. नरेंद्र दाभोलकर म्हणाले होते की, ‘बाळूमामाच्या मेंढरांची भक्ती ही अंधश्रद्धाच आहे. परंतु ज्यांना ती करावयाची असेल, त्यांना भारतीय घटनेनुसार आम्ही आड येत नाही. परंतु या भक्तीला दैवी चमत्काराची जोड देऊन फसवणूक सुरू झाल्याने समितीने आव्हान दिले आहे. बाळूमामाच्या मेंढरांना समितीचे हे आव्हान कायमस्वरुपी आहे आणि पुरेशा पूर्वसूचनेने ही आव्हानप्रक्रिया आम्ही केव्हाही पार पाडू.’ (अंनिस वार्तापत्र आॅगस्ट २००५) बाळूमामाची मेंढर खरच जर दैवी शक्ती व चमत्कारी असती तर ती साध्या कारच्या धडकेने मेली असती का ? कारण शनिवारी साडेसात वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या मिरगाव येथे बाळूमामाच्या मेंढ्या असलेल्या तेरा नंबरच्या पालखीचा मुक्काम होता. या पालखीसोबत असणा-या सुमारे अडीचशे मेंढ्यांचा कळप पंचाळे शिवारातील एका शेतीच्या दिशेने रस्त्याने जात होता. तेव्हा भरदार वेगातील स्विफ्ट कार थेट कळपात घुसली. यावेळी चेंगराचेंगरी होऊन १२ ते १५ मेंढ्या मृत्युमूखी पडल्या तर काही जखमी झाल्या आहेत.(मटा १२ फेब्रु. २०२३) मेंढ्या जर चमत्कारी असत्या तर धडकेने मेल्याच कशा ? पंधरा मेंढ्यापैकी एक तरी मेंढीने ताटकन जिंवत होऊ नये का ? शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे मेंढ्यांचे खांड तिकडे ताडोबा अभयारण्यात सोडून द्यायला काय बाळूमामा ट्रस्टला भिती वाटतेय का ?

बाळूमामांच्या मेंढरांनी पिके खाल्ल्याने लोक संतप्त होते कारण बाळूमामांच्या मेंढरांनी वासुंबे (ता. तासगाव, जि. सांगली) येथील पिके खाल्ल्याने शेतकऱ्यांचे जवळपास अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी मेंढरे अडवून ठेवली. तक्रार देण्यासाठी थेट पोलीस ठाणे गाठले. बाळूमामा ट्रस्टचे पदाधिकारी आल्यानंतर मेंढरे सोडण्यात आली. पिकांचे नुकसान केल्याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद नाही. तसेच वासुंबे येथे आदमापूर (जि. कोल्हापूर) येथील संत बाळूमामांच्या सहा हजार मेंढ्यांचा कळप बुधवारी (ता. ६) सकाळी येथे आला. येथे आल्यानंतर तीन दिवस त्याने परिसरातील द्राक्षबागा, सोयाबीन, हळद यासारख्या पिकांबरोबरच इतर खरीप पिकांचे नुकसान केले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय मेंढरे न सोडण्याचा पवित्रा घेतला. बाळूमामा ट्रस्ट, भक्तगण व शेतकऱ्यांच्या मध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे वातावरण संतप्त बनले होते. नुकसान भरपाईवरून चर्चा सुरूच होती. शेवटी ट्रस्टने नुकसानभरपाई देण्याचे तोंडी मान्य केले. तरीही आमची मेंढ्यांच्या लेंड्या खाणारी येडी पिलावळ मेंढराला नवस करायला हजारोंच्या संख्येंने गर्दी करतात व मेंढरांच्या कानात आपली इच्छा सांगितल्यास इच्छापूर्ती होते असे म्हणतात. बाळूमामा आणि त्यांच्या मेंढरांना लोक जणू ईश्वरी अवतार मानतात. ही मेंढरं शेतात बसून गेली की, शेताचं भाग्य फळफळतं, अशी त्यांची अंधश्रद्धा आहे. पण ही मेंढरं लोकांच्या शेतात चरायला जातातच; परंतु फुकटच्या चरण्याबरोबर वरकमाई देखील मिळवून आणतात. या कमाईतूनच भुदरगड तालु्क्यातील आदमापूर येथे दीड कोटी रुपयांचा ‘बाळूमामा देवालय ट्रस्ट’ उभा करण्यात आला आहे. मेंढरांची संख्या अतिरिक्त झाली की, त्यांची विक्रीही करण्यात येते. मागच्या वर्षी मेंढराच्या ताफ्यातील सत्तावीस लाख रुपयांची नर मेंढरं विकण्यात आली. (अंनिस वार्तापत्र आॅगस्ट २००५)

‘बाळूमामाची मेंढरं’ हा विषय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बैठकीत चर्चेसाठी घेऊन सातारा शहराच्या जवळच असलेल्या सोनगाव, माजगाव या गावी मेंढरे आल्याने त्याबाबत प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याचे ठरविले. सकाळी ९ व रात्री ९ वाजता आरतीचा कार्यक्रम होई त्यानंतर आरतीच्या पूर्वी रुग्णांचे अनुभवकथन होई. मेंढरांच्या सान्निध्याने, बाळूमामाच्या समाधीचे दर्शन घेऊन किंवा आजार गंभीरच असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे तीन किंवा पाच वाऱ्या करून आपले आजार कसे बरे झाले, हे लोक सांगत असत. त्या सर्व बाबी दैवी चमत्काराच्या होत्या. उदा. – कॅन्सर, अर्धांगवायू, आंधळे, मुके बहिरेपण. अशा जवळपास अशक्यप्राय व्याधींनी ग्रस्त असलेली माणसे, बाळूमामाच्या मेंढरांनी आपल्या जीवनात कसा चमत्कार घडला, याचे वर्णन रसभरीत करत. ‘आपली कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी मेंढरांना नवस करा, मेंढरांची ओटी भरा’ असे आवाहन ध्वनिक्षेपकावरून वारंवार केले जाई आणि खणा-नारळाने मेंढरांची ओटी भरण्यासाठी माणसांची रांग लागलेली असे. याबरोबरच आणखी दोन बाबी कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्या. त्यातील एक गोष्ट म्हणजे भाविक मेंढरांना आपल्या शेतात बोलवतात, हे अर्धसत्य आहे. पूर्णसत्य हे आहे की, दैवी (!) वरदान लाभलेली ही मेंढरं बिनदिक्कतपणे कोणाच्याही शेतात घुसतात आणि शेतातील उभ्या पिकांचे नुकसान संबंधित शेतकरी ‘तोंड दाबून बु्क्क्यांचा मार’ म्हणून सहन करतात. (माणसापरास मेंढरं अंनिवार्ता. आॅगस्ट २००५)

त्यामुळे शेवटी बहुजन समाजाला सांगावं वाटतं की, मुळात अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका. आज श्रद्धेच्या नावाखाली उद्या तुम्हाला भिती दाखवून तुमची लूट केली जाते. बांधासाठी भावाची डोकी फोडणारा आमचा समाज उभ्या पिकात मेंढ्या सोडून लेंड्या खातो तेव्हा खुप वाईट वाटत. मेंढ्या आणि लेंढ्यांना भिऊन उभ्या पिकांची माती करू नका. ज्यांना भिती वाटते त्यांनी खुशाल उभ्या धानात मेंढ्या सोडून काय लेंड्या खायच्यात त्या खाव्यात त्यांच्याशी आमचं काही देण घेण नाही. पण जो कोण या मेंढ्यांच्या कळपांना विरोध करतोय त्याला मुळीच त्रास देऊन त्यांची बदनामी करू नका. परंतु शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या मेंढ्या आणि लेढ्यांची किव करणा-या मनोरूग्णांसाठी विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
भावाच्या म्हशीने बांध ओलांडला । म्हणूनी मारला भाऊ त्याने ॥१॥
बाळूमामाच्या तो चारी मेंढराला । गहू चिकातला येडझवा ॥२॥
मेंढराच्या लेंड्या धरूनी ओटीत । ठेवी देव्हा-यात पुजावया ॥३॥
खावा रे तळुनी लेंड्याचा चिवडा। विश्वंभरा पीडा काय त्याची ॥४॥

नवनाथ रेपे लिखित
१. भट बोकड मोठा
२. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !

वरील पुस्तके घरपोच मिळतील
संपर्क रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. ९७६२६३६६६२

Leave A Reply

Your email address will not be published.