सनातन धर्म हा डासाप्रमाणे पसरणाºया डेंग्यू मलेरियासारखा – क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचे  वकतव्य

0 17

सनातन धर्म हा डासाप्रमाणे पसरणाºया डेंग्यू मलेरियासारखा
– क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचे  वकतव्य

चैन्नई : तामिळनाडूचे क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एमक़े़ स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी, सनातन धर्म हा डासांमुळे पसरणाºया डेंग्यू आणि मलेरियासारखा आहे, आणि याचा नायनाट करणे आवश्यक आहे, असे वक्तव्य केल्याने तिव्र संताप व्यक्त केला जात आहे़
तामिळनाडू प्रोग्रेसिव्ह रायटर्स फोरमतर्फे आयोजित केलेल्या सनातनम निर्मूलन संमेलनात ते बोलत होते़ यावेळी क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री उदयनिधी स्टॅलिन हे आपल्या भाषणात म्हणाले की, ‘सनातन धर्म’ संपवण्यासाठी आयोजित केलेल्या या संमेलनात मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचा आभारी आहे़ या संमेलनात ‘सनातन धर्म’ संपुष्टात आणा असे संबोधल्याबद्दल मी आयोजकांचे अभिनंदन करतो़ अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला संपवल्या पाहिजेत आणि आपण फक्त निषेध करू शकत नाही़ डास, डेंग्यू, कोरोना आणि मलेरिया अशा गोष्टी आहेत ज्यांचा आपण प्रतिकार करू शकत नाही़ आपण याला दुर केले पाहिजे़ सनातन धर्मही असाच आहे, त्यामुळे आमचे पहिले काम सनातनला विरोध करणे नाही तर तो नष्ट करणे हे आहे़
सनातन धर्म समता आणि सामाजिक न्याय या दोन्हींच्या विरोधात आहे़ ‘सनातन धर्माचा अर्थ काय ?’ श्वाश्वत किंवा बदलता येत नाही असे काहीतरी, ज्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही, हा सनातनमचा अर्थ आहे़ सनातनम जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडतो, असे म्हटले़ मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे़

Leave A Reply

Your email address will not be published.