‘सनातन धर्म हा डासाप्रमाणे’ मी पुन्हा बोलणार : उदयनिधी स्टॅलिन – ममता बॅनर्जीकडून सनातन धर्माचा आदर

0 5

‘सनातन धर्म हा डासाप्रमाणे’ मी पुन्हा बोलणार : उदयनिधी स्टॅलिन
– ममता बॅनर्जीकडून सनातन धर्माचा आदर

चैन्नई : तामिळनाडूचे क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी, सनातन धर्म हा डासांमुळे पसरणाºया डेंग्यू आणि मलेरियासारखा आहे, आणि याचा नायनाट करणे आवश्यक आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने देशभर तिव्र संताप व्यक्त केला जात आहे़ यात ममता बॅनर्जीकडून सनातन धर्माचा आदर करत असल्याचे म्हटले आहे़ यावर सनातन धर्म डासाप्रमाणे आहे हे मी वारंवार म्हणणार असल्याचा इशारा त्यांनी दिला़
तामिळनाडू प्रोग्रेसिव्ह रायटर्स फोरमतर्फे आयोजित केलेल्या सनातनम निर्मूलन संमेलनात ‘सनातन धर्म’ संपवण्यासाठी आयोजित केलेल्या या संमेलनात सनातनला विरोध करणे नाही तर तो नष्ट करणे हे आहे, असे मी जे बोललो ते पुन्हा पुन्हा बोलणार असल्याचा इशारा त्यांनी दिला़ यावेळी त्यांनी आपण हिंदूच नाहीतर जातीभेदाचा निषेध करत बोलल्याचे म्हटले़
क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना कोरोना विषाणू, मलेरिया, डेंग्यू विषाणू आणि डासांमुळे होणारा ताप यांच्याशी केली होती़ स्टॅलिन यांच्या वक्तव्याबाबत सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे़ याविषयी भाजपने म्हटले की, द्रमुक नेत्याने सनातन धर्म मानणाºया ८० टक्के लोकांचा ‘नरसंहार’ करण्याचा कौला दिला आहे़ मात्र याविषयी उदयनिधी यांनी त्यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत़
भाजकडून आपल्यावर लावलेले आरोप फेटाळताना उदयनिधी स्टॅलिन यांनी सांगितले की, सनातन धर्मामुळे पीडित आणि उपेक्षित लोकांच्या बाजूने बोललेल्या प्रत्येक शब्दावर मी ठाम आहे़ पेरियार आणि भीमराव आंबेडकर यांचे सनातन धर्म आणि त्याचे समाजावर होणारे नकारात्मक परिणाम यावर विस्तृत संशोधन क रणारे विस्तृत लेखन मी कोणत्याही व्यासपीठावर मांडण्यास तयार असल्याचे सांगितले़
काय म्हणाले होते मंत्री उदयनिधी स्टॅलिन
सनातन धर्म समता आणि सामाजिक न्याय या दोन्हींच्या विरोधात आहे़ ‘सनातन धर्माचा अर्थ काय ?’ श्वाश्वत किंवा बदलता येत नाही असे काहीतरी, ज्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही, हा सनातनमचा अर्थ आहे़ सनातनम जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडतो, असे म्हटले़ मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे़
मी सनातन धर्माचा आदर करते : ममता बॅनर्जी
मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी केलेल्या वक्तव्याचा ममता बॅनर्जी यांनी निषेध केला़ मी सनातन धर्माचा आदर करते, सनातन धर्मात असणारे पुजारी देवाची सेवा करतात, त्यामुळे मी त्याचा आदर करते असे म्हटले़

 

Leave A Reply

Your email address will not be published.