संभाजी ब्रिगेडची मंगरुळपीर तालुका कार्यकारणी घोषित – तालुका सचिवपदी देवेंद्र खिराडे तर तालुका उपाध्यक्ष पदी योगेश सुडके यांची निवड

0 57

संभाजी ब्रिगेडची मंगरुळपीर तालुका कार्यकारणी घोषित

– तालुका सचिवपदी देवेंद्र खिराडे तर तालुका उपाध्यक्ष पदी योगेश सुडके यांची निवड

 

मंगरुळपीर : मंगरुळपीर येथील विश्रामगृहात नुकतीच संभाजी ब्रिगेडची ‘तालुका आढावा बैठक’ मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी अनेक युवकांनी संभाजी ब्रिगेड पक्षात जाहीर प्रवेश केला.तसेच या बैठकीत संभाजी ब्रिगेडची तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेड वाशिमचे जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजाननदादा भोयर,संभाजी ब्रिगेड वाशिमचे जिल्हा महासचिव मा.शेख इसाक, जिल्हा कार्याध्यक्ष मा.रमेश मुंजे, जिल्हा प्रवक्ता मा.विकास देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष मा.श्रीकृष्ण शिंदे, तालुकाध्यक्ष अजय गवारगुरु, विधानसभा अध्यक्ष नयन कऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मंगरुळपीर तालुका कार्यकारणीत संभाजी ब्रिगेडच्या तालुका सचिवपदी देवेंद्र खिराडे, वाशिम जिल्हा संघटकपदी गजानन व्यवहारे, तालुका उपाध्यक्ष पदी योगेश सुडके, दीपक इंगळे, तालुका कोषाध्यक्ष पदी सचिन मनवर, तालुका प्रवक्ता पदी भास्कर जीवने, तालुका सहसंघटक पदी अरविंद मोराडे आदी नवीन कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष अजय गवारगुरु यांनी तर आभार गणेश चिपडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता देवेंद्र खिराडे, दादाराव अव्हाळे, अमर भगत, गजानन व्यवहारे, अक्षय ठाकरे, श्रीकृष्ण भरदुक, शुभम बोबडे, गणेश चिपडे, योगेश सुडके, योगेश गांजरे, प्रकाश मिसाळ, हरीश गव्हाणे, अजय वाणी, अनिकेत जामकर, अविनाश इंगोले, गोविंदा गहुले, शरद भगत, मयूर काळे, गोविंदा लांडकर, रुपेश डहाणे, सचिन मनवर, देवेंद्र धोटे, ऋषिकेश सारस्कर, ओम जाधव, सोहम राठोड, सुनील गव्हाणे, अमोल जाधव, प्रकाश भोयर आदींनी पुढाकार घेतला होता, यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.