वाशीम येथे कार्यकर्ता सन्मान दिवस साजरा – संभाजी ब्रिगेड चा नाविन्यपूर्ण उपक्रम राष्ट्रीय अध्यक्ष मनोज आखरे यांचा वाढदिवस

0 35

वाशीम येथे कार्यकर्ता सन्मान दिवस साजरा

– संभाजी ब्रिगेड चा नाविन्यपूर्ण उपक्रम राष्ट्रीय अध्यक्ष मनोज आखरे यांचा वाढदिवस

वाशिम : येथील शासकीय विश्राम भवन मध्ये संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. मनोज दादा आखरे यांचा वाढदिवस कार्यकर्ता सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष शिवश्री गजानन दादा भोयर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व शिवश्री गणेश सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष शिवश्री नारायणराव काळबांडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष इस्माईल खा पठाण व शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष परमेश्वर काळबांडे यांची विशेष उपस्थिती लाभली.
इतर राजकीय पक्षांमध्ये कार्यकर्त्यांना केवळ राजकीय लाभासाठी वापरली जाते परंतु संभाजी ब्रिगेड हा कार्यकर्त्यांच्या हितासाठी झटणारा पक्ष असून पक्षकेंद्री राजकारणापासून कार्यकर्ता केंद्री राजकारण आवश्यक असल्याचे मत गजानन दादा भोयर यांनी व्यक्त केले. कार्यकर्त्याच्या धडावर स्वतःचे मस्त कसा व ते पुस्तकाच्या सहाय्याने अधिकाधिक विकसित करावे असा मोलाचा सल्ला नारायणराव काळबांडे यांनी दिला. संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी काळात राज्यसत्ता हस्तगत करेल अशी आशा जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हासचिव शेख इसाक,जिल्हा कार्याध्यक्ष रमेश मुंजे, सखाराम पाटील ढोबळे, मराठा सेवा संघ माजी जिल्हाऊपाध्यक्ष दिनकरराव बोडखे, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, जिल्हा प्रवक्ता विकास देशमुख, प्रसिद्धीप्रमुख गजानन खंदारे, रिसोड तालुका अध्यक्ष गोपाल खडसे, मंगरूळपीर तालुका अध्यक्ष अजय गवारगुरु, संभाजी ब्रिगेड माजी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर वाघ, विधानसभा अध्यक्ष नयन कऱ्हे यासह विजय झुंझारे,विठ्ठल असोले,धनंजय गोरे सरपंच सोनखास, गजानन गोरे,धीरज सरनाईक,दत्ता ठाकरे,गजानन व्यवहारे,गजानन ठाकरे,संतोष भिसडे,राधेश्याम शिरसाठ,अमोल वाकुडकर,शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास देशमुख तर आभार श्रीकृष्ण शिंदे यांनी मानले.

कार्यकर्त्यांनी आपल्या विवेकी बुद्धीचा वापर करून समाज व राष्ट्राच्या एकता आणि अखंडतेला गालबोट लागणार नाही असे आचरण करावे जेणेकरून भारताला विकसित राष्ट्र म्हणून जगासमोर आणता येईल असे मार्गदर्शन गजानन खंदारे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.