परळी तहसील कार्यालयासमोरील बेमुदत ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस – वेगवेगळ्या राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचा पाठिंबा

0 19

परळी तहसील कार्यालयासमोरील बेमुदत ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस

– वेगवेगळ्या राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचा पाठिंबा

 

परळी (वार्ताहर) : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने परळी तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने परळी येथे मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यासाठी 2 सप्टेंबर पासून बेमुदत ठिय्या सुरुवात झाली आहे 3 सप्टेंबर रोजी दुसऱ्या दिवशी या आंदोलनाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस, बी आर एस, एम आय एम, वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटना, मराठा सेवा संघ, अखिल भारतीय छवा संघटना, अखिल भारतीय वीरशैव समाज, संभाजी सेना, संभाजी ब्रिगेड, विद्युत तांत्रिक कामगार युनियन तसेच तालुक्यातील ग्रामपंचायत सेवा सहकारी सोसायटी यांनी पाठिंबा देऊन आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आहे.या आजच्या ठिय्या आंदोलनाला परळी शहर ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळाला हे आंदोलन जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असं या प्रसंगी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.