भिमसैनिकांच्या विरोधानंतर शिवप्रतिष्ठानच्या मनोहर कुलकर्णी यांची मुंबईतील सभा रद्द

1 915

भिमसैनिकांच्या विरोधानंतर शिवप्रतिष्ठानच्या मनोहर कुलकर्णी यांची मुंबईतील सभा रद्द

 

मुंबई : वादग्रस्त व बालीस वक्तव्य करून नेहमी चर्चेत राहणारे शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी यांच्या चांदीवली संघर्ष नगर येथील रविवार दि. १६ जुलै रोजी आयोजित सभेला भीम आर्मी, वंचित बहुजन आघाडी व दलित युथ पँथरने जोरदार विरोध केला. यामुळे कुलकर्णी यांची नियोजित सभा रद्द करण्यात आली.

दलित संघटनांनी केलेल्या विरोधानंतर चिरागनगर घाटकोपर पोलिसांनी चांदीवली येथील मनोहर कुलकर्णी यांच्या सभेला परवानगी नाकारली. यानंतर त्यांची सभा घाटकोपर पश्चिमेतील मन्नू मार्केट येथील एका ईमारतीत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मनोहर कुलकर्णी यांच्या गाडीच्या समोर भीम आर्मीच्या कार्यकत्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवले.

मनोहर कुलकर्णी यांच्या गाडीसमोर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवले त्यामुळे कार्यक्रम न करताच कुलकर्णी आलेल्या वाटेने परत निघून गेले. या प्रकरणात भीम आर्मीचे माजी महाराष्ट्र अध्यक्ष अशोक कांबळे व सामाजिक कार्यकर्ते विकी शिंगारे यांना पोलिसांनी ताब्यात घेत नंतर सोडून दिले. दरम्यान, याप्रकरणी विनापरवानगी सभेचे आयोजन केल्याची तक्रार घाटकोपर येथील चिरागनगर पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती भीम आर्मीचे अविनाश गरूड यांनी माध्यमांना दिली.

1 Comment
  1. Vaibhav Teke says

    ती सभा पूर्ण यशस्वी रित्या पार पडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.