अग्निवीराप्रमाणे होणार आता शिक्षकांची मानधनावर शिक्षण स्वयंसेवक म्हणून निवड

0 781

अग्निवीराप्रमाणे होणार आता शिक्षकांची मानधनावर शिक्षण स्वयंसेवक म्हणून निवड

 

नागपूर : केंद्र सरकारने अग्निवीर ही योजना आणून तरुणांना रोजगार देण्याच्या नावाखाली त्यांच्या उज्वल आयुष्याला मातीत मिसळण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचा  तरुणांना आरोप केला होता. आता त्याचप्रमाणे शिक्षक क्षेत्रात काम करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी अग्निवीराप्राणे होणार आता शिक्षकांची मानधनावर शिक्षण स्वयंसेवक म्हणून निवड करण्याचा निर्णय नागपूर जिल्हा परिषदेने घेतला आहे.

जिल्हयाअंतर्गत शिक्षकांची पदे मोठया प्रमाणावर रिक्त असल्यामुळे स्थानिक पातळीवरुन वारंवार शिक्षक उपलब्ध करुन देण्याबाबत मागणी असुन शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. करीता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हिताचे दृष्टीने जि. प. सेस फंडातुन शिक्षकांची अत्यंत आवश्यकता असलेल्या जिल्हा परिषद, प्राथमिक/ उच्च प्राथमिक / माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळामध्ये जि.प. व्दारा ठरवून दिलेल्या अटी व शर्तीचे अधिन राहून गट शिक्षणाधिकारी यांचे सनियंत्रणाखाली संबंधित शाळा व्यवस्थापन समितीचे माध्यमातुन रु. ५०००/- प्रति महीना या मर्यादेमध्ये तात्पुरत्या स्वरुपात शिक्षण स्वयसेवकांची नेमुणक करण्याबाबत योजना प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

नागपूर जिल्हा परिषदेने एक परिपत्रक काढून या योजनेची सविस्तर माहीती प्रसिद्ध केल्यानंतर तरुणांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली आहे.  कारण केंद्र सरकारने अग्निवीर योजना आणल्यानंतर त्याला देशभरातून विरोध झाला होता तसाच विरोध सध्या राज्यातील तरूण करण्याच्या तयारी आहेत असे वातावरण दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.