शिवप्रतिष्ठानचे मनोहर कुलकर्णी वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा संभाजी ब्रिगेडची पोलिसांकडे मागणी

0 526

शिवप्रतिष्ठानचे मनोहर कुलकर्णी वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा संभाजी ब्रिगेडची पोलिसांकडे मागणी

 

उमरगा : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे मनोहर कुलकर्णी हे नेहमी वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज व स्वातंत्र्यदीन यांचेवर भाष्य केल्याने समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे त्यांचेवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा अशी मागणी मंगळवार दि. २७ जून रोजी संभाजी ब्रिगेड उमरगा यांचेकडून पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनात केली आहे.

संभाजी ब्रिगेड उमरगा यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या आपल्या निवेदनात मनोहर कुलकर्णी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या निवेदनात संभाजी ब्रिगेडने म्हटले की, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे प्रमुख मनोहर भिडे यांनी “येणा-या १५ ऑगस्ट ला व २६ जानेवारीला तिरंगा झेंडा फडकावयाचा नाही.” असे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कारण आपल्या देशाला जुलमी सत्तांपासून स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले. ज्यांनी आपला व आपल्या परिवारांचा विचार न करता देश प्रथम म्हणुन देशांसाठी देशांच्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र कष्ट, हाल, अपेष्ठा सहन केल्या परिणामी देशांसाठी बलिदान दिले. अशा शुरवीर क्रांतीकारकांच्या शौर्याला सलामी देण्यासाठी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. ज्यांच्या बलिदानामुळे आपण स्वतंत्रपणे राहु शकतो, स्वातंत्रपणे बोलु शकतो.असा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करू नये म्हणजे हा आपल्या देशाप्रती गद्दारी केल्यासारखे आहे असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मनोहर कुलकर्णी हे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा संभाजी ब्रिगेडकडून महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संभाजी ब्रिगेडने आपल्या निवेदनात दिला आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेड उमरगा तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार, तालुका उपाध्यक्ष अजित भोसले, वसंत माने, प्रदिप पाटील, शहर कार्याध्यक्ष लक्ष्मण शिंदे, शहर अध्यक्ष मंगेश भोसले, दत्ता अष्टे, अभि भोसले,सुशांत बिराजदार, कोषाध्यक्ष अनिल वाकळे आणि विकास जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.