नाशिक जिल्ह्यातील मौजे शिरसगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतीचा लिलाव शेतकरी संघटनेचे नेत्यांनी हाणून पडला. – धनंजय पाटील काकडे.

0 130

नाशिक जिल्ह्यातील मौजे शिरसगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतीचा लिलाव शेतकरी संघटनेचे नेत्यांनी हाणून पडला. – धनंजय पाटील काकडे.

नाशिक : जिल्ह्यातील नाशिक जिल्हा को-ऑपरे बँकेने शिरसगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील शेतकरी श्री सूर्यभान पंढरीनाथ मोरे, राजेंद्र दत्तात्रय मोरे, संजय शिवाजी मोरे, वसंत विठ्ठल आहेर, या चार शेतकरी भावांचा शेतीचा लिलाव  सोमवार दि. ७ ऑगस्ट रोजी झाला होता . त्यावर चर्चा करण्यात आली, व तसेच मौजे शिरसगाव या ठिकाणी तलाठी, महसूल अधिकारी, बँकेचे अधिकारी, ग्रामसेवक, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष श्री साहेबराव गणपत मोरे, तसेच ग्रामपंचायत सरपंच श्री रवींद्र शिरसाठ, यांच्या उपस्थितीत सर्व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वरील शेतकऱ्यांचा शेतीचा लिलाव आज रोजी हाणून पाडला. या कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी सर्वश्री शेतकरी नेते श्री धनंजय पाटील काकडे, अमरावती (महाराष्ट्र ), नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष श्री भगवान भाऊ बोराडे नाशिक, शेतकरी संघर्ष संघटनेचे सुधाकरराव मोगल निफाड, या उपस्थित नेत्यांनी शेतकरी विरोधी कायदे व लिलाव होणाऱ्या शेतीचे कायदे व इतर माहिती , व पुढील शेतकरी व्यवस्थेसाठी संघर्ष करण्याची भूमिका उपस्थित त्यांना समजून सांगितली वस्तुस्थिती शिरसगाव येथील व तसेच निफाड तालुक्यातील शेतकरी सुद्धा उपस्थित शासनाने पुकारलेला शेतीचा लिलाव सर्वच शेतकऱ्यांच्या ताकदीने एकत्र येऊन हाणून पाडला. यावेळी महाराष्ट्रातील शेतकरी नेते श्री धनंजय पाटील काकडे यांनी लिलाव प्रसंगी जाहीर भाषण करून वस्तुस्थिती समजून सांगितली.

Leave A Reply

Your email address will not be published.