क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात वीरांगनांच्या कहाण्यांना दिला उजाळा 

0 141

क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात वीरांगनांच्या कहाण्यांना दिला उजाळा 

 

पुणे (प्रतिनिधी): येत्या १५ ऑगस्टला आपण स्वातंत्र्याच्या शहात्तराव्या वर्षात प्रवेश करत आहोत. त्यानिमित्ताने स्वातंत्र्यलढ्यात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक अज्ञात वीरांगनांनी आपलं आयुष्य देशासाठी समर्पित केलं. त्यांच्या या प्रेरणादायी आयुष्यातून प्रेरणा घेत आजच्या प्रश्नांना आपण भिडले पाहिजे असे प्रतिपादन अभिव्यक्तीच्या कार्यकर्त्या श्रद्धा रेखा राजेंद्र यांनी केले. निमित्त होते अभिव्यक्ती आयोजित स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात वीरांगनांच्या कहाण्या या कार्यक्रमाचे.
महात्मा गांधीं आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने भारतीय जनतेने जो अपूर्व लढा दिला त्याचं फळ म्हणजे भारताचे स्वातंत्र्य! जगाच्या इतिहासातील सर्वात मोठं आंदोलन म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्यलढा. देशातील जवळपास 20% लोक म्हणजे प्रत्येक 5 पैकी एक जण म्हणजे जवळपास एका घरातून एक जण ह्या लढाईत सामील होती. ह्यात सर्व स्तरातला अतिश्रीमंता पासून ते अत्यंत गरीब महिलांनी योगदान दिले. सर्व जाती-धर्माच्या होत्या. शिक्षित-अशिक्षित..अशा असंख्य महिलांचे नाव तर इतिहासातही नोंदली गेली नाहीये. खरोखर त्यातील अजून बर्‍याच अज्ञात आहेत. त्यांना जे जे शक्य होत ते सर्व काम त्यांनी केले. स्वातंत्र्यलढ्यातील पहिली महिला हुतात्मा झालेली १८ व्य शतकातली  तामिळनाडूमधील शिवगंगाई या संस्थानची राणी कूयिली. इंग्रजांचा शस्त्रसाठा नष्ट  करायचा कट रचला आणि पारही पडला. नानासाहेब पेशवे यांना एकुलती एक मुलगी मैनावती. तिने इंग्रज कुटुंबांना विद्रोही सैनिकांपासून वाचविले मात्र स्वतःच्या वडिलांच्या विद्रोहात मदत केली म्हणून ब्रिटिशांनी तिला झाडाला बांधून पेटवून देण्याची आज्ञा दिली. आणि अत्यंत धडाडीची मौनावती शहीद झाली पण नानासाहेबांचा ठावठिकाणा कळू दिला नाही. याशिवाय गुढीपाडव्याला गुढीबरोबरच तिरंगी झेंडा लावण्याचे आवाहन करणाऱ्या जानकीबाई आपटे. 400 भिल्ल विरांगनांनी ब्रिटिशांना दिलेलं तोंड. बेगम हजरत महल, पेरीनबेन कॅप्टन, मीरा बहेन, कॅप्टन लक्ष्मी सहगल, आझाद हिंद फौजेच्या झांशी रेजिमेंटमध्ये नसिफा नावाची १५ वर्षाची मुलगी, अवघ्या १७ व्या वर्षी शहीद झालेली कनकलता बरूआ, राणी गाइदिन्ल्यू, हौसाबाई पाटील आणि अशा कितीतरी गरीब-श्रीमंत घरातील राणी ते आदिवासी-शेतकरी सर्व जातीधर्माच्या स्त्रियांनी गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत आनंदाने आणि कोणत्याही भीतीशिवाय ब्रिटिशांशी वेळप्रसंगी दोन हात केले आणि जितके जास्तीत जास्त देशासाठी करता येईल ते केले. हा इतिहास सर्वसामान्य जनतेपर्यंत-पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपलं काम आहे. अशी प्रतिक्रिया बैठीकीला जमलेल्या स्त्रिया-मुलींनी दिल्या. अभिव्यक्तीने या ज्ञात-अज्ञात विरांगणाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांवर एक पोस्टर प्रदर्शन तयार केले असून विविध कॉलेजमध्ये त्याचे प्रदर्शन मांडले असता त्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे श्रद्धा यांनी सांगितले. यासोबतच याचे माहिती सांगणारे विविध स्टॉल सुद्धा विविध मंडळामध्ये लावण्यात येणार आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.