पाच वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार ! – केज पोलिस ठाणे हद्दीतील घटना

0 193

पाच वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार !

– केज पोलिस ठाणे हद्दीतील घटना

 

बीड (प्रतिनिधी) : पाच वर्षाच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळ जनक घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी घडली.दरम्यान पीडित बालिकेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावामध्ये मजुरी करून जगणाऱ्या कुटुंबातील मुलगी शेजारच्या अण्णा उर्फ अरुण रावसाहेब भांगे वय ५२ वर्ष यांच्या नातवंडा सोबत खेळत होती. खेळत असताना अरुण भांगे या नराधमाने या चिमुरडीस घरात बोलावून घेतले. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या घटने संदर्भात मुलीच्या आईने केज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या नाराधमाविरोधात कलम 376 अ ब 4(2) बाललैंगिक अपराध संरक्षण अधिनियम 2012 कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.