संभाजीनगर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये स्थलांतरित करण्यात यावे – संभाजी ब्रिगेडची मागणी

0 61

संभाजीनगर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये स्थलांतरित करण्यात यावे – संभाजी ब्रिगेडची मागणी

 

परळी (वार्ताहर) : येथील संभाजीनगर पोलीस स्टेशन चे स्थलांतर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये करण्यात यावे. अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सध्या परळी पोलीस स्टेशन हे शहरासाठी दोन असून एक शहर पोलीस स्टेशन तर एक संभाजीनगर पोलीस स्टेशन असे दोन पोलीस स्टेशन आहेत. गणेशपार रोड ते जलालपुर पर्यंत स्टेशन रोड मार्गे दक्षिणेला शहर पोलीस स्टेशन हद्द आहे तर उत्तरेला संभाजीनगर पोलीस स्टेशन हद्द येते. शहर पोलीस स्टेशनच्या जागेतच दहा बाय दहा च्या दोन खोल्या मध्ये संभाजीनगर पोलीस स्टेशनचे कामकाज चालते संभाजीनगरची हद्द आणि पोलीस स्टेशनची जागा याचा काडीमात्र संबंध येत नाही. संभाजीनगर पोलीस स्टेशनचे स्थलांतर पद्मावती भागातील पंचायत समितीच्या नवीन इमारतीमध्ये किंवा कन्या शाळेची जागा हा एक पर्याय असल्यामुळे त्या जागेत संभाजीनगर पोलीस स्टेशनचे स्थलांतर करण्यात यावे. अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.ठाण्याचे स्थलांतर केल्यास एकतर संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येच त्या पोलीस स्टेशनचे कामकाज चालेल.दुसरी गोष्ट त्या पोलीस स्टेशनचे आजूबाजूला उपजिल्हा रुग्णालय, स्टेट बँक ऑफ इंडिया, जिल्हा परिषद शाळा, गटशिक्षणाधिकारी कार्यालय यासह वर्दळीचा भाग असल्याने कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील. लवकरच याबाबतीत बीड पोलीस अधीक्षक यांना समक्ष भेटून निवेदनही देणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.