बहुजन संतांच्या अभंग वाणीत, गाथेत, दोहात, भारूडात कशातच “हिंदू” हा शब्द सापडत नाही !

0 268

बहुजन संतांच्या अभंग वाणीत, गाथेत, दोहात, भारूडात कशातच “हिंदू” हा शब्द सापडत नाही !

 

बीड : हिंदू म्हटलं की, आजचे तरुण पेटून उठतात ! पण या शब्दाचा नेमका अर्थ आणि त्या शब्दामागची पार्श्वभूमी समजून उमजून न घेताच तरुण हुर्रे करतात. त्याबद्दली एक पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ती पोस्ट खालीलप्रमाणे…

 

हिंदू शब्दाचा अर्थ

हिंदू हा मराठी शब्द नाही, हिंदी पण नाही, संस्कृत पण नाही, इंग्लिश पण नाही, मगधी पण नाही, आणि हा शब्द भारतीय सुध्दा नाही.. तो शब्द “परशियन” “फारसी” शब्द आहे.

इ.स १२ व्या शतकात मोघल जेव्हा भारतात आले. ते धर्मांने इस्लामिक होते. पण त्यांची बोली व लेखनी ‘परशियन’ ‘फारसी’ होती. भारतात येऊन जेव्हा भारतातल्या स्थानिक मूळनिवासी लोकांना हरवले तेव्हा त्यांनी हरलेल्या, हरविलेल्या लोकांना “हिंदू” हि तुच्छास्पद शिवी घातली. तेव्हा पासून “हिंदू” शब्द प्रचलित झाला.

{ भारतात कलकत्ता येथे मोठी लायब्ररी मध्ये परशियन डिक्शनरी आहे त्यात हिंदू शब्दाचा अर्थ तुम्ही सुद्धा बघू शकता.}

( Analysis of हिंदु शब्द : – परशियन शब्दकोशा मधल्या हिंदू शब्दाचा अर्थ हिनदू = गुलाम, चोर, घाणेरडा, काळ्या तोंडाचा. हिंदू हा शब्द दोन शब्दाचा बनलेला नसून तीन शब्दाचा {हि+न+दू} असा आहे त्याचा अपभ्रष होऊन दोन शब्दी हिंदू असा झाला आहे.)

दयानंद सरस्वती स्वतः १८७५ ला हे मान्य करताे व त्याच्या “सत्यार्त प्रकाश” या पुस्तकात ‘हिंदू हि मोघलांनी दिलेला शिवी आहे’ असे नमुद करताे. शिवाय तो हिंदू समाज स्थापन न करता “आर्य समाज” स्थापन करतो.

नंतर हिंदू पासून ‘हिंदूस्थान’ मोघलांनीच तयार केला..

( Analysis of हिंदुस्तान :- हिन = म्हणजे तुच्छ, दलिद्र, घाणेरडा. दून = म्हणजे लोक, प्रजा, जनता..
स्तान (स्थान)= म्हणजे ठिकान, जागा..)

“भारत” कधी ही ‘हिंदूस्थान’ नव्हता आणि नाही.

इ.स १२ व्या शतका अगोदर हिंदू शब्द कोणत्या ही ग्रंथात, बोलण्यात किंवा लिहिण्यात आलेला नाही, म्हणून तर खाली दिलेले.

(विदेशी ब्राह्मणी ग्रंथ – रामायण, महाभारत, उपनिषध, भगवत गीता, ज्ञानेश्वरी, श्रृति, स्मृति, मनुस्मृति, दासबोध, ४ वेद, १८ पुराणं, ६४ शास्त्र किंवा बहुजन संतांच्या अभंग वाणीत, गाथेत, दोहात, भारूडात कशातच “हिंदू” हा शब्द सापडत नाही)

इतिहास तपासून घ्यावा. आणि योग्य बरोबर असेल तो सांगावा.

“हिंदू” हा शब्द या भारत देशाला किंवा प्रचलित धर्माला मोघलांनी दिला, आणि विदेशी ब्राम्हण आपल्याला सांगत असतात “गर्व से कहो हम हिंदू है”

शिवी आम्ही गर्वाने कशी म्हणावी… ???

मोघलांनी जेव्हा हिंदूंना (गुलामांना, हरलेल्यांना) झिजिया कर लावला तेव्हा तो झिजिया या कर विदेशी ब्राम्हण लोकांनी देण्यास नकार दिला व मोघलांना सांगितले कि आम्ही ही तुमच्या सारखे बाहेरुन आलेलो आहोत, तुमच्या पुर्वी इथल्या लोकांना (मूळनिवासी भारतीय) आम्ही हरविले आहे. आम्ही झिजीया कर भरणार नाही कारण आम्ही हिंदू नाहीये.

विदेशी ब्राम्हण लोक स्वतःला हिंदू कधीच म्हणवून घेत नाहीत. विदेशी युरेशियन ब्राम्हण स्वतःला ऋग्वेदी ब्राम्हण, यजुर्वेदी ब्राम्हण, कोकणस्थ, देशस्थ, किरवंत ब्राम्हण, पाठारे प्रभू, CKP (चांद्रसेनिय कायस्थ प्रभू) अर्थात अर्धवट शुद्र ब्राम्हण इत्यादी म्हणवून घेत असतात. पण तो शुद्रांना, अर्थात एस.सी, एस.टी, ओबिसींना, धर्म परिवर्तीतांना, हिंदू म्हणतो, आणि मानतो..!

आपल्या नावाचे बारसे दुसर्‍यांनी (म्हणजे मोघलांनी) घातले. ही गोष्ट ब्राम्हण लोकांना माहिती आहे. पण आपल्याला माहीत नाही. काय दुर्दैवाची गोष्ट आहे.

अशी आहे हिंदू शब्दाची कर्म कहाणी. तुम्ही गर्वाने म्हणा, किंवा त्याचा प्रचार करा. घ्यायचे आहे ते नाव घ्या, आम्हाला हरकत नाही पण आम्हाला खरा इतिहास कळू द्या व सांगू द्या.

मी प्रथम ही भारतीय आहे आणि शेवट ही भारतीय आहे.

अधिक माहीतीसाठी संदर्भ ग्रंथ वाचा..

१. हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात नाही, लेखक श्रीकांत शेट्टे
२. बहुजन हिंदू आहेत काय ? लेखक अँड इतिहासकार अनंत दारवटकर
३. शिवाजी कोण होता ? लेखक काॅ गोविंद पानसरे
४. सत्यार्त प्रकाश, महर्षि दयानंद सरस्वती
५. धर्मशास्त्रांचा इतिहात, भारतरत्न पा.वा.काणे

Leave A Reply

Your email address will not be published.