कोल्हापूर पद्माराजे दत्तक विधानाचा अन्याय….

0 1,021

कोल्हापूर पद्माराजे दत्तक विधानाचा अन्याय….

फक्त पद्माराजे व राजवर्धन कदमबांडे यांच्या वर नसून तो आमच्या समस्त धुळे जिल्हा वाशियांवर अन्याय आहे.

✍🏻 शिवश्री किरण अलकाबाई रोहिदास मराठे (पवार)
दह्याणे 8408808924

 

आज २६ जुन लोकराजा राजर्षी शाहु महाराज यांची जयंती. जगातील सर्वोत्तम संविधान लिहणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्षी शाहु यांची जयंती दिवाळी सणासारखी साजरी करावी. म्हणून आम्हा धुळे पुण्यनगरी वाशियांसाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे की अशा महान राजा शाहू यांचे रक्ताचे वारस असणाऱ्या वंशज धुळ्यात वास्तव्य करतात. राजर्षी शाहु महाराज यांना ३ अपत्य होते राजाराम महाराज, प्रिन्स शिवाजी व कन्या राधाबाई.
थोरले पुत्र राजाराम् महाराज यांचा विवाह बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड यांची नात व फत्तेसिंह महाराज यांची कन्या इंदुमती यांच्याशी झाला होता. लग्नानंतर त्यांचे नाव ताराराणी असे ठेवण्यात आले. राजाराम महाराज व ताराराणी साहेब यांना ५ ऑक्टोबर १९४० रोजी कन्या झाली तिचे नाव होते “पद्माराजे” कोल्हापूरच्या शाहूंचे ६ मे १९२२ रोजी मृत्यू झाला त्यानंतर राजाराम राजे यांचा राज्यरोहनचा पार पडला. तेव्हापासून राजाराम महाराज राज्य कारभार करू लागले. १९४० ला राजाराम महाराज यांचा मृत्यू झाला. ताराराणी साहेब रीजन्सी कौन्सिल समितीच्या अध्यक्ष म्हणून शाहूंच्या अधिकृत वारस होत्या. पुढे ३१ मार्च १९४७ रोजी दत्तक विधानाचा निकाल लागला. ताराराणी साहेब यांनी शाहु महाराज यांची कन्या राधाबाई उर्फ आक्कासाहेब यांचे लग्न शाहू महाराज यांच्या हयातीत देवासचे नरेश तुकोजी पवार यांच्याशी लावुन दिले होते.त्याच आक्कासाहेब यांचे पुत्र व ताराराणी यांचे भाचे मेजर जनरल विक्रमसिंह पवार यांना दत्तक घेतले. आणि दत्तक विधानानंतर त्यांचे नाव ठेवले छत्रपती शहाजी महाराज ठेवले.पुढे १९५५ मध्ये ताराराणी साहेब यांचा मृत्यू झाला. जन्म झाल्यानंतर १ महिन्यांनी पित्याचे छत्र हरपले. नंतर १५ वर्षांची असताना आईचे छत्र हरपले त्या म्हणजे पद्माराजे साहेब.त्यामुळे पद्माराजे यांना जनतेचे अपार प्रेम मिळाले होते.पुढे १६ फेब्रुवारी १९५९ मध्ये पद्माराजे यांचा विवाह धुळ्यातील तोरखेडचे जहागिरदार रघुजीराजे कदमबांडे यांच्याशी झाला.हा एक ऐतिहासिक विवाह सोहळा होता.कारण पद्माराजे यांच्यावर कोल्हापूर वासियांचे भावनिक नाळ जोडलेली होती.ज्यावेळी पद्माराजे सासरला जायला निघाल्या त्यावेळी रवींद्र सबनीस हे नगराध्यक्ष होते.त्यांनी करवीर जनतेच्या वतीने जाहीर पाठवणी समारंभ करून निरोप दिला.हा समारंभ फारच भावनिक आणि भावनोत्कट झाला प्रत्येकाच्या मनाला चटका लागला.”जा मुली जा,दिल्या घरी सुखी रहा” अशीच भावना जनतेच्या प्रत्येकाच्या मनात होती. या विवाह सोहळ्याच्या समारंभाने पद्माराजे यांच्याबद्दल जनतेमध्ये अफाट सहानुभूती निर्माण झाली.तत्पूर्वी काही काळ अगोदर छत्रपती शहाजी महाराज यांच्या नंतर पुढचा वारस कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. अशा चर्चा लोकांच्या मनात येत असतानाच इकडे धुळ्यामध्ये मातोश्री पद्माराजे यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्या पुत्राचे “राजवर्धन” असे नामकरण झाले. त्याचवेळी कोल्हापूरच्या गादीच्या वारसाच्या प्रश्नाने नवीन उचल खाल्ली व जनतेने पद्माराजे यांच्या मुलालाच दत्तक घ्यावे,अशी मागणी प्रबळ जोर धरू लागली.पुढे ती मागणी जनतेची चळवळ म्हणून सुरू झाली.त्या मागणी मध्ये छत्रपतींचे भूतपूर्व दरबारी मेजर दादासाहेब निंबाळकर यांचा प्रामुख्याने पुढाकार होता.त्या चळवळीचे नेतृत्व राजाराम महाराज यांची द्वितीय पत्नी विजयमाला राणीसाहेब म्हणजे दक्षिणेतील तंजावर येथील मोहिते घराण्यातील कन्या होत्या.छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधु व्यंकोजी राजे यांचे घराणे तेथे तंजावर मध्ये राज्य करत होते.छत्रपती विजयमाला महाराणी साहेब यांच्या नेतृत्वात २४ जुन रोजी ऐतिहासिक मोर्चा निघाला दत्तक प्रश्नावर नवीन राजवाड्यावर लाखाचा मोर्चा निघाला त्यात प्रामुख्याने महिला,बहुसंख्य पहिलवान सामील होते.तेथे दंगलीला सुरुवात झाली,लोक राजवाड्यात घुसले.त्यात काही लोकांनी पोलीस जीप पलटी करून पेटवून दिली.त्यावेळी राजवाड्यात त्यावेळचे खासदार भाऊसाहेब महागावकर राजवाड्यातच होते.परंतु ते शहाजी महाराज यांच्या बाजूने होते. खासदार साहेब राजवाड्याबाहेर आले व मोर्चाच्या नेत्या छत्रपती विजयमाला महाराणी साहेब यांना राजवाड्यात येऊन शहाजी महाराज यांची भेट घ्यावी अशी विनंती केली. परंतु महाराणी साहेब यांनी त्यास नकार दिल्यावर १० ते १५ लोकांचे शिष्टमंडळ शहाजी महाराज यांना भेटायला गेले.त्यात मेजर दादासाहेब निंबाळकर देखील होते.त्यांनी एक निवेदन शहाजी महाराज यांना दिले त्यात पद्माराजे याचे पुत्र राजवर्धन यांचे दत्तकाबद्दलची मागणी होती.परंतु शहाजी महाराज म्हणाले की,दत्तकाबद्दल माझा निर्णय जाहीर झाला आहे. त्यावर एक जण पद्माराजे यांच्याबाजूने म्हणाला हा आपला खाजगी प्रश्न आहे.,पण आमच्या जन भावनेचा विचार व्हावा.त्यावर शहाजी महाराज म्हणाले की,हा प्रश्न माझा खाजगी आहे,असे म्हणून शिष्टमंडळाने व्यक्त केलेल्या मतांवर नो कॉमेंट्स असे म्हणाले.तदनंतर शहाजी महाराज मेजर दादासाहेब निंबाळकर यांना उद्देशून म्हणाले की,तुम्ही आमच्या घराण्याचे एक सोडून दोन दत्तक विधान पाहिले आहेत तर तुम्ही सांगा या मंडळींना दत्तक कसे निवडतात ते..!परंतु निंबाळकर यांनी काहीही उत्तर दिले नाही.तेवढ्यात एक महिला त्वेषपुर्ण भाषेत म्हणाली की,शहाजी महाराज यांनी बिंदू चौकात सभा घेऊन आपली बाजु मांडावी.त्यावर शहाजी महाराज म्हणाले की,घरगुती भांडणे घेऊन बिंदू त्यावर शहाजी महाराज म्हणाले की घरगुती भांडणे घेऊन बिंदू चौकात उतरण्याची पद्धत आमच्या छत्रपती राजघराण्यात नाही आहे. तोपर्यंत बाहेर दंगा सुरू होता.लोक राजवाड्यात घुसण्याचा प्रयत्न करीत होते. अशा वातावरणात एक तरुण राजवाड्याच्या टॉवर वर चढला आणि त्याने तेथील “भगवा झेंडा काढून त्याठिकाणी काळा झेंडा लावला”..! छत्रपती शहाजी महाराज बुद्धिमान आणि त्यांची भूमिका स्पष्ट होती. त्यांनी सारी परिस्थिती लक्षात घेतली.आणि १२ जुलै १९६२ ला जो दत्तक विधान समारंभ व्हायचा होता.तो त्यांनी मोठ्या गुप्ततेने २८ जुन १९६२ ला बेंगलोर येथे जाऊन पार पाडला.त्यात त्यांनी नागपूरचे राजे राजारामसिंह आणि शहाजी राजे यांची कन्या शालिनी राजे यांचा मुलगा दिलीपसिंहराव यांना वारस म्हणून दत्तक घेतले आणि दत्तक विधाननंतर दिलीपसिंहराव यांचे नाव “युवराज शाहुराजे” असे नामकरण झाले.आणि हेच ते विद्यमान छत्रपती शाहु महाराज…!! तरीही त्यांनतर पद्माराजे सहाय्यक समितीने महाराष्ट्र सरकार, दिल्ली सरकार यांच्याकडे शिष्ट मंडळ नेऊन न्याय मिळावा असे खुप प्रयत्न केले.परंतु त्यात काहीही निष्पन्न झाले नाही.पद्माराजे यांचा मुलालाच दत्तक घ्या ..,ही जी मागणी होती.त्यातील हा मुलगा म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नाही.ते म्हणजे धुळे जिल्ह्याचे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणजेच तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते श्रीमान राजवर्धनजी रघुजीराजे कदमबांडे होय…!! (संदर्भ….. माजी आमदार बाजीराव धारवाडे लिखित इतिहासग्रंथ…”जुनं कोल्हापूर”…..)

…….वरील सर्व प्रकरणाचा अभ्यास केला असता माझे व्यक्तिगत मत असे म्हणते की, मातोश्री पद्माराजे यांच्या दत्तक विधान प्रकरणात अन्याय तर झालाच आहे. परंतु तो अन्याय फक्त पद्माराजे, राजवर्धन कदमबांडे साहेब या परिवारावरच नव्हे तर समस्त धुळे जिल्हा वासियांवर झाला आहे.असे माझे स्पष्ट मत आहे….!
तसेच ह्या सबंध प्रकरणात मला एक गोष्ट समजत नाही आहे की, १९३७ मध्ये तुकोजीराव यांच्या निधनानंतर विक्रमसिंहराव पवार हे देवासच्या गादीवर बसले व त्यांनी देवासचा राज्यकारभार उत्तम पद्धतीने केला.त्याच काळात इंदोरचे अधिपती श्रीमंत यशवंतराव होळकर यांना प्रकृतीच्या कारणासाठी अमेरिकेला जावे लागले होते.तेव्हा यशवंतराव होळकर यांनी संपुर्ण अधिकार देऊन इंदोर संस्थानचा राज्यकारभार विक्रमसिंहराव यांच्या स्वाधीन केला (२० सप्टेंबर १९४२ ते १५ मे १९४३) या काळात उत्तम कारभार केल्यामुळे यशवंतराव होळकर यांनी “अहिल्याबाई होळकर सलतनत” पदक देऊन त्यांचा खास गौरव केला. ….एका संस्थानिकाने दुसऱ्या संस्थानिकाचा राज्यकारभार पाहिल्याचे हे हिंदुस्थानातील एकमेव उदाहरण आहे.त्याकाळच्या व्हाईसरॉयनीही त्यांचा गौरव केला. दुसऱ्या संस्थांनीकाचा राज्यकारभार पाहणारे हे विक्रमसिंहराव म्हणजेच नंतर चे दत्तक विधान झालेले छत्रपती शहाजी महाराज आहेत.मग मनाला प्रश्न पडतो की,दुसऱ्याचा राज्यकारभार इमानदारीने पाहणारे शहाजी महाराज यांना ज्या ताराराणी साहेब यांनी दत्तकविधान करून राज्यकारभार सोपविला मग शहाजी महाराज छत्रपती यांनी ताराराणी साहेब व राजाराम महाराज यांच्या कन्या पद्माराजे यांच्यावर अन्याय का ? केला असावा. याचे कोड पडले मनाला.
एका महानायक यांचा व त्यांचा वारसांचा अभ्यास करावयास एक ऐतिहासिक ग्रंथ निर्माण करून ठेवल्याबददल श्री बाजीराव धारवाडे यांनाही शाहु जयंती निमित्त विनम्र अभिवादन…!

Leave A Reply

Your email address will not be published.