दह्याणे मध्ये शाहु महाराज जयंती साजरी

0 172

दह्याणे मध्ये शाहु महाराज जयंती साजरी

 

धुळे (किरण मराठे) : जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाही, अशा पालकांना प्रति दिवस १ रु दंड ठोठावनारा अद्वितीय राजा शाहु छ्त्रपती यांच्यासारख्या राजा असण्याची गरज आहे असं शाहू महाराज जयंतीनिमित्त गावाच्या प्रथम नागरिक सौ. अल्काबाई अशोक राजपुत यांनी म्हटले.

जिल्ह्यातील दह्याणे गावात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे आयोजनाप्रसंगी त्या बोलत होत्या. त्यांचे हस्ते शाहु महाराजांच्या प्रतिमेचे पूजन
करून शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय शिक्षण उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी कॉ.गोविंद दादा पानसरे लिखित राजर्षी शाहु वसा आणि वारसा या पुस्तकाच्या २६ प्रतींचे वाचकांना भेट म्हणून देण्यात आले. तसेच गावाचे डॉ दिवाकर भवर यांनीही शालेय उपयोगी साहित्याची भेट जयंतीच्या निमित्ताने निस्वार्थ भावनेने सहकार्य केले.जयंतीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. अल्काबाई अशोक राजपुत होत्या व कार्यक्रमाचे प्रास्ताविक गावाचे उपसरपंच श्री रोहिदास आप्पा यांनी केले व शाहु महाराज यांच्या जीवनाचा तरुण पिढीने आदर्श घ्यावा असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.तसेच उपस्थितांमध्ये ज्येष्ठ मंडळी गोपीनाथ पाटील,एकनाथ पाटील,विठ्ठल पाटील,देविदास पवार,तात्याकाका पाटील, रोहिदास रंगा पवार, बंडु नाना पवार,भिमराव मोरे,दयाल बाबा नाईक, गोलू पाटील, भटु भाऊ खाटीक,कैलास राजपुत, साहेबराव राजपूत,तसेच मराठी शाळेतील मुख्याध्यापक श्री रामकृष्ण खैरनार,शिक्षक अरुण गवळे आता,इतर शिक्षक ,महिला शिक्षक व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.