संविधानद्रोही अजय सेंगरला भिमसैनिकांकडून चोप

0 495

संविधानद्रोही अजय सेंगरला भिमसैनिकांकडून चोप

Ajay Sengar वारंवार वादग्रस्त विधानं करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारे करणी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख अजय सेंगर यांना पुन्हा तेच केल्यानं काही आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. भारतीय राज्यघटनेबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप मारहाण करणाऱ्यांनी केला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
करणी सेनेचे महाराष्ट्रातील प्रमुख असलेले अजय सेंगर हे अनेकदा आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत आले आहेत. आत्ताही त्यांनी भारतीय राज्यघटनेबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप त्यांना मारहाण करणाऱ्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी केला आहे. यापूर्वीही सेंगर यांनी कोरेगाव येथील विजय स्तंभावर बुलडोजर चालवून तो उद्ध्वस्त करणार असे वक्तव्य करून आंबेडकरवादी समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. हा स्तंभावव राज्य सरकारने प्रतिबंध घालून हे स्मारक उद्धवस्त करण्याची मागणी याच अजय सेंगर यांनी केल होत. यामुळे पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात बहुजन समाजाच्या भावना दुखावून जातीयवादाला खतपाणी घालून त्यांच्या भावना भडकवण्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या अजय सेंगरने ‘संविधान हटवा आणि मनुस्मृतीनुसार देश चालवा’ अशी मागणी केली होती. त्यामुळे सेंगर आणि आंबेडकरवादी यांच्यात कायम संघर्ष पहायला मिळतो. आज मात्र, सेंगर यांच्या अशाच पद्धतीच्या संविधानविरोधी वक्तव्यामुळं काही आंबेडकरवाद्यांनी त्यांच्यावर थेट हल्ला चढवत कपडे फाटेपर्यंत चोप दिला असून या मारहाण प्रकरणी पोलीस कारवाईबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.