अंजनडोह (मेघातांडा) येथे अंगणवाडी सेविका बोगस नियुक्ती आदेश रद्द करण्यासाठी आमरण उपोषण

0 331

अंजनडोह (मेघातांडा) येथे अंगणवाडी सेविका बोगस नियुक्ती आदेश रद्द करण्यासाठी आमरण उपोषण

धारूर (प्रतिनिधी): तालुक्यातील अंजनडोह येथील मेघातांडा येथील अंगणवाडी सेविकेला दिलेले बोगस नियुक्ती आदेश रद्द करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्या मुक्ताबाई राऊ राठोड यांनी मेघातांडा येथील अंगणवाडी समोर आमरण उपोषण सुरू केले असुन प्रशासनाला अनेक वेळा अर्ज-विंनती करुनही दखल घेतली नाही.असे त्यांनी सांगितले असुन,मेघातांडा येथील अंगणवाडी सेविका बोगस नियुक्ती आदेश रद्द करणे. अंगणवाडी कार्यरत असताना बालमाता आदेश देण्याची आवश्यकता नाही, असा मुख्यकार्यकरी अधिकारी यांचे आदेश आहेत.बालविकास प्रकल्प अधिकारी यांना तक्रारी अर्ज दि.२४ आॅगस्ट २०२२ मेघातांडा येथील ग्रामस्थांचा अर्ज.गटशिक्षणाधिकारी यांना कुसुम बाळणारे यांचा तीन अपत्य असल्याचा तक्रारी अर्ज २०:१०:२०२२.बालविकास प्रकल्प अधिकारी यांना विठ्ठल कांबळे यांचा तीन अपत्य असल्याचा २४:०२:२०२३ रोजीचा अर्ज.ईत्यादी मागण्यासाठी ग्रामपंचायत सदस्या मुक्ताबाई राऊ राठोड यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
ग्रामपंचायत अंजनडोह चे उपसरपंच प्रकाश पंडितराव सोळंके, सरपंचपुत्र प्रमोद सोळंके व ग्रामसेवक साखरे यांनी उपोषण कर्त्याला उपोषणा पासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पंचायत समिती धारूरचे सांख्यकी विस्तार अधिकारी कुलकर्णी यांनी उपोषणाला भेट दिली त्यांच्या समवेत सुपरवायझर पांडे होते. यावेळी कुलकर्णी यांनी लेखी पत्र दिले असुन पत्रात म्हटले आहे की, या प्रकरणाची सुनावणी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या समोर सुरू असल्यामुळे सुनावणी नंतर निकाल आपल्याला कळवण्यात येईल.भ्रमणध्वनीवर बोलतांना ते म्हणाले की, हा आदेश माझ्या कार्यकाळातील नाही, सुनावणीच्या वेळी योग्य ती बाजु मांडु.

उपोषण कर्त्या मुक्ताबाई राठोड या मात्र उपोषणाला ठाम होत्या,त्या नंतर उपसरपंच प्रकाश पंडितराव सोळंके व प्रमोद सूर्यकांत सोळंके यांनी आ. प्रकाश सोळंके यांना भ्रमणध्वनीवर उपोषणाची माहिती दिली, आ. प्रकाश सोळंके यांनी तात्काळ बीड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना सम्पर्क केला,मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी उपोषण कर्त्याला बीडला पाठवण्याचे सांगितले.त्या नंतर आ.प्रकाश सोळंके यांनी उपोषण मागे घेण्याचे सांगितले, त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.