राजशेखर जाधव सैन्यदलात अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल माजी केंद्रीय संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांचे हस्ते सत्कार

0 58

राजशेखर जाधव सैन्यदलात अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल माजी केंद्रीय संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांचे हस्ते सत्कार

 

धुळे (किरण मराठे): ‘पुत्र असावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ! या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे सर्वसाधारण कुटुंबातील रिक्षाचालक सुरेश जाधव व परिचारिका कमलाबाई यांचे सुपुत्र राजशेखर जाधव याची सैनिदलात अधिकारी म्हणून नियुक्ती झाली, याने आपल्या आईवडीलांचे नाव उत्तुंग शिखरावर नेवून ठेवल्याबद्दल धुळे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व केंद्रीय संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते सत्कार मंगळवार दि. २७ जून २०२३ रोजी संपन्न झाला.

आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करीत राजशेखरने मारलेली ही मजल तरुणांसाठी एक आदर्श ठरणारी आहे त्यामुळे मित्र, नातेवाईक व गावांसह जिल्ह्यातील लोक त्यांच्या कार्याच कौतुक करताना दिसत आहेत. सर्वांच्याच मनावर राज करणारा राजशेखर हा भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून लेप्टनंट या पदावर नियुक्त झाल्याबद्दल त्याच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे. त्याचाच भाग म्हणून सामाजिक कार्यात अग्रभागी असणारे “द्वारकाधीश” प्रतिष्ठानच्या वतीने राजशेखर याचा सत्कार समारंभ आयोजित केला गेला.
धुळे लोकसभा मतदारसंघ संघाचे माजी खासदार तसेच माजी संरक्षण मंत्री मा. सुभाष भामरे यांनी आपल्या भाषणात राजशेखर याचा गौरव करताना म्हणाले की, लेफ्टनंट या पदापर्यंत अगदी कमी वयात पोहचणे म्हणजे कोणा येड्या गबाळाचे काम नव्हे..! अशा म्हणत त्यांनी राजशेखरचा गौरव केला.

यावेळी हा सत्कार समारंभ आयोजित करणारे अमोलभाऊ मासुळे यांनीही त्याचे अभिनंदन केले. कार्यक्रमाप्रसंगी डॉ सुभाष भामरे, महापौर प्रतिभाताई चौधरी, मा.सुनील भाऊ बैसाने,नगरसेवक संतोष खताळ,आयोजक नगरसेवक. अमोल भाऊ मासुळे,समाजसेवक किशोर आप्पा सरगर,मनिबाबा खैरनार,मनोज भाऊ सरगर, युवराज सूर्यवंशी तसेच मित्र परिसरातील अनेक मान्यवरांनी राजशेखरचे अभिनंदन करण्यासाठी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.