भागवत फडणवीस अन्याय तेवढाच करा जेवढा तुम्हाला सहन होईल श्रीकांत होवाळ यांचा संघ भाजपला इशारा

0 394

भागवत फडणवीस अन्याय तेवढाच करा जेवढा तुम्हाला सहन होईल; श्रीकांत होवाळ यांचा संघ भाजपला इशारा

 

लातूर : तुम्ही रक्तपात पेराल तर रक्तपात उगवेल, तुम्ही द्वेष पेराल तर द्वेष उगवेल, तुम्ही अन्याय केला तर अन्यायच उगवेल त्यामुळे तुम्ही आमच्यावर अन्याय आत्याचार आणि आमचा रक्तपात तेवढाच करा जेवढा तुम्हाला सहन होईल कारण आज सहकार तुमचं आहे उद्या आमच सरकार आल्यास व्याजासह हिशोब चुकता करण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बीएमपीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ यांनी खुला इशारा दिला आहे, ते दि. २७ जून रोजी लातूर येथिल जनसंवाद दौ-यात बोलत होते.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी दादर येथून दि. ५ मे २०२३ रोजी सुरू झालेली महाराष्ट्र राज्यव्यापी जनसंवाद परिवर्तन यात्रा मिशन २०२४ ही मंगळवार दि. २७ मे २०२३ रोजी काल लातूर मधील संविधान चौकामध्ये आली होती. त्यावेळी केसीआर हे संघ भाजपचे पार्सल आहे, हे बीजेपीच्या इशा-यावर काम करत आहेत. केसीआर जर शेतक-यासाठी अबकी बार किसान सरकार म्हणतं असतील तर शेतकऱ्यांना मातीत घालणा-या इव्हीएम मशिनविरोधात का बोलत नाहीत असे श्रीकात होवाळ यांनी म्हटले. यावेळी विचारांचावर उद्घाटक म्हणून महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अण्णाराव पाटील, अॅड. उदय गावारे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिपक इंगळे, अनुभव मंडप लातुरचे मनोज राघो व बहुजन मुक्ती पार्टी लातूर जिल्हाध्यक्ष . दत्ताभाऊ करंजीकर, जिल्हा उपाध्यक्ष जलील अत्तार, जिल्हा प्रचारक प्रेम शिंदे व जिल्हा सचिव बंडुसिंग भाट ठाकूर हे उपस्थित होते.

स्वतः ला हिंदुत्ववादी समजणा-या सरकार म्हणणा-या केंद्र आणि राज्य सरकारने नोकरभरती रद्द करून हिंदू तरुणांना बेरोजगार केले आहे. मा. नरेंद्र मोदींनी चाय शिकलेला कोणी पाहीला नाही, परंतू देश विकताना पाहील आहे यावर काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आणि बीआरएस न बोलता शांत का बसून आहेत. आजपर्यंत झालेले सगळे प्रधानमंत्री हे साडेतीन टक्यामधील होते, पण नरेंद्र मोदी हे आमचे ओबीसी आहेत परंतू ते ओबीसी विरोधात काम करत आहेत. त्यामुळे माणूस आमचा असला तरी त्याला संघ भाजपने गुलाम करून ठेवले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे पाॅवरफुल्ल नेते नसून त्याची पाॅवर मोहन भागवतांकडे आहे असं म्हणत त्यांनी संघ भाजप यांचेवर निशाणा साधला.सन १९३१ पासून ओबीसींची जनगणना रोखली असून सर्वोच्च न्यायालयात आम्ही जनगणना करणार नाही असं प्रतिज्ञापत्र मोदींनी लिहून दिलं आहे. तेव्हा त्यांना आमचा प्रश्न आहे की, नरेंद्र मोदी कोणाला घाबरत आहेत असा प्रश्न त्यांनी विचारत संघ भाजप यांचेवर निशाणा साधला यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.