घोणसी येथे राष्ट्रीय किसान मोर्चाच्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला विंगची स्थापना

0 84

घोणसी येथे राष्ट्रीय किसान मोर्चाच्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला विंगची स्थापना

 

लातूर : जिल्ह्यातील घोणसी येथे राष्ट्रीय किसान मोर्चाची महाराष्ट्रातील पहिली महिला आघाडीची स्थापना करण्यात आली. या शाखेची स्थापना राष्ट्रीय किसान मोर्चाचे राज्यप्रभारी मा.बालाजी कांबळे सर यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय किसान मोर्चाचे जळकोट तालुक्याचे अध्यक्ष मा.बाबासाहेब भोसले यांच्या प्रयत्नाने स्थापन केली.

राष्ट्रीय किसान मोर्चाने खूप कमी काळात समाजाचा कमावलेला हा विश्वास आहे. पुरुष शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून महिलांना दिलेले हे पाठबळ नक्कीच ऐतिहासिक अस आहे, प्रेरणादायी अस आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला या शेतीप्रमाणेच राष्ट्रीय किसान मोर्चा या शेतकरी संघटनमध्ये देखील आता रस्त्यावरील संघर्षासाठी तयार असतील हा संदेश घोणसी गावांतील शेतकरी महिलांनी दिला आहे असं राष्ट्रीय किसान मोर्चाचे राज्यप्रभारी मा.बालाजी कांबळे म्हणाले.

सदरील कार्यक्रमास राष्ट्रीय किसान मोर्चाचे राज्य प्रभारी मा. बालाजी कांबळे सर ,राष्ट्रीय किसान मोर्चा जळकोट तालुकाध्यक्ष मा. बाबासाहेब भोसले, भारत मुक्ती मोर्चाचे मा.दत्तू मामा कोकणे, असंघटित बांधकाम कामगार विंगचे राज्य कार्यकारिणी सदस्य मा. धनंजय उजळमकर इ व शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.