कामचुकार शिक्षकांचा कारभार चव्हाट्यावर

0 1,016

कामचुकार शिक्षकांचा कारभार चव्हाट्यावर

 

लातूर : जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलांची येथे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा २०२३ या परिक्षेचे केंद्र होते. या केंद्रावरील कामचूकार शिक्षकांना धडे देण्याची वेळ आली आहे. कारण यांच्याकडे असलेल्या अल्प बुद्धीमुळे सामान्य घरातील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बीडमधील शिरूर कासार तालुक्यातील शिक्षकाला तर जवाहर नवोदय विद्यालय परिक्षेचा परिक्षा फाॅर्म भरण्याची अक्कल नसल्याचे सिद्ध झाले तर चाकुर मधील शिक्षिकेला वेळेचे भान आणि घड्याळाचे ज्ञान नसल्याचे समोर आल्याने यांना शिक्षक तरी कसे म्हणावे असा प्रश्न पालकांना पडत आहे.

या केंद्रावर परिक्षेदरम्यान झालेला सावळा गोंधळ पाहून यांना शिक्षक तरी कसे म्हणावे असा प्रश्न पडतो कारण. दि. २९ एप्रिल २०२३ रोजी जि.प.प्रा.शाळा चाकूर केंद्र क्रमांक १३०४०३०४ हाॅल क्रमांक ४ मध्ये सकाळी १०:३० वाजता २४ विद्यार्थी परिक्षा देण्यासाठी हजर झाले. यांच्या परिक्षेची वेळ ही सकाळी ११:३० ते दुपारी ०१:३० पर्यंत होती. मात्र दुपारी १ च्या सुमारास या वर्गातील सर्व मुले बाहेर येताना शाळेच्या आवारात बसलेल्या पालकांच्या निदर्शनास आली. मात्र लगेच पाच मिनिटांच्या फरकाने त्यांना परत हाॅल क्रमांक ४ मध्ये बोलावून घेतले. हा झालेला प्रकार पालकांच्या लक्षात येत नसल्याने त्यांनी शाळेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्याठिकाणी येऊ दिले जात नव्हते.

त्यानंतर ०१:३० मिनिटाला सर्व मुली बाहेर पडली असता पालकांनी आपल्या पाल्यांना पेपर संबंधी चौकशी करून तुम्ही १ वाजता बाहेर का आला होतात याची चौकशी केली असता त्या मुलांनी जे सांगितले ते ऐकून एखाद्या पालकाने अशा मुर्ख शिक्षकांना जर पायतानाचे फटके द्यायला सुरूवात केली तर त्याचा दोष पालकांना देता येईल. मुलाने पालकांना सांगितले की, १ वाजण्यासाठी केवळ दोन मिनिटे बाकी असताना एका शिक्षिकेने सांगितले की, तुमचा पेपर दोन मिनटात संपणार आहे. त्यावेळी त्या शिक्षिकेला मुलांनी सांगितले की पेपरची वेळ ०१:३० पर्यंत असताना तुम्ही चुकीचा वेळ का सांगत आहात. तेव्हा या शिक्षिकेने मुलांचे घड्याळ मागे असल्याचे सांगून विद्यार्थांना बाहेर काढण्याचा प्रताप केला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाईगडबडीत प्रश्नांची उत्तरे सोडवुन उत्तर पत्रिका शिक्षिकेच्या हातात देऊन विद्यार्थी बाहेर पडले.

हाॅल क्रमांक ४ मधील विद्यार्थी बाहेर जात आहेत हे शेजारील हाॅलवर असलेल्या शिक्षिकेच्या लक्षात आल्यानंतर त्यांना पेपर सुटण्यास अर्धा तासाचा अवधी शिल्लक असल्याचे हाॅल क्रमांक ४ वरील शिक्षिकेच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर या शिक्षिकेने मेंढर वळवल्यागत मुलांना वर्गाकडे वळवून त्यांच्या उत्तरपत्रिका त्यांना परत देऊन तुमच्या परिक्षेचा वेळ ०१:३० पर्यंत असल्याने तुम्ही आता वाचत बसा असे सांगितले. पण विद्यार्थ्यांनी घाईगडबडीत उत्तराची वर्तुळे रंगवल्याने त्यांना शांत बसण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता.

हा घडलेला प्रकार जागरूक पालकांनी तात्काळ सीईओ यांच्या निदर्शनास आणून दिला तेव्हा संबंधित शिक्षिकेने वेळेचा अंदाज न आल्याने अशी चूक झाल्याचे कबूल केले. मात्र त्या विद्यार्थ्यांनी घाईगडबडीत उत्तरे सोडल्यामुळे त्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले त्याला कोण जिम्मेदार आहे असा प्रश्न पालकांना पडत असल्याने त्यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या शिक्षिकेवर कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाधिकारी लातूर यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.