हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही, ब्राह्मण धर्माला हिंदू धर्म म्हणण्याचे कारस्थान – स्वामी प्रसाद मौर्य यांचे घणाघाती वक्तव्य

0 117

हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही, ब्राह्मण धर्माला हिंदू धर्म म्हणण्याचे कारस्थान
– स्वामी प्रसाद मौर्य यांचे घणाघाती वक्तव्य

 

लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि समजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा हिंदू धर्मावर घणाघाती हल्ली केला आहे़ लखनौमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते म्हणाले की, हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही, ब्राह्मण धर्माला हिंदू धर्म म्हणण्याचे कट कारस्थान आहे़.
या कार्यक्रमात बोलताना स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदू धर्म ही केवळ फसवणूक आहे. ब्राह्मण धर्माला हिंदू धर्म म्हणण्याचा हा डाव आहे. हिंदू धर्म असता तर आदिवासींनाही आदर मिळाला असता. सर्व विषमतेचे कारण ब्राह्मणवाद आहे. दलित आणि आदिवासींना जाळ्यात अडकवण्याचा हा प्रयत्न आहे. यापुढे मौर्य म्हणाले की, ब्राह्मणवादाची मुळे खूप खोलवर रूजली आहेत. हिंदू धर्म असता तर या समाजात मागासलेल्यांचा सन्मान झाला असता, पण आदिवासी समाजातून येणा-या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मंदिरात जाण्यापासून रोखले जाते ही काय गंमत आहे.

सपाचे खासदार आणि अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव या स्वत:ला हिंदू म्हणवून घेत आहेत, आणि हिंदू धर्मात कोणीही कोणाचा शत्रू नाही असे सांगत आहे. याविषयी पत्रकारांनी डिंपल यांना सपा खासदार शफीकुर रहमान बुर्के योगी आदित्यनाथ त्यांचे शत्रू नसून मित्र असल्याचे म्हटले होते, या विधानाबाबत प्रश्न केला असता डिंपल यांनी यांनी म्हटले की, आमचा कोणी शत्रू नाही. आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू ज्या धर्माचे पालन करतात तो सनातन धर्म आहे. सनातन धर्मात कोणीही शत्रू नाही आणि त्यांनी हे सांगितले तर मला आनंद आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.