धारूर तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांचा अग्रीम मध्ये समाविष्ट करा – संभाजी ब्रिगेडची निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे मागणी

0 113

धारूर तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांचा अग्रीम मध्ये समाविष्ट करा
– संभाजी ब्रिगेडची निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे मागणी 

 

धारूर : तालुक्यातील तेलगाव, अंजनडोह, धारूर, मोहखेड महसूल मंडळात २१ दिवसापेक्षा जास्तीचा पावसाचा खंड पडला असुन तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात पिके नेस्तनाबूत होत असताना, पिकविम्याच्या २५ टक्के अग्रीमसाठी तेलगाव, अंजनडोह, धारूर महसूल मंडळ वगळले आहे. तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात पावसाचा २१ दिवसापेक्षा जास्त दिवस पाऊस न होऊन पिके नेस्तनाबूत होत असताना पिकविम्याच्या अग्रीमसाठी तालुक्यातील महसूल मंडळ वगळले आहे, ही बाब अत्यंत चुकीची असून शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. तेलगाव व‌ इतर महसूल मंडळात २१ दिवसापेक्षा जास्त दिवस पाऊस न पडल्याने २५ टक्के अग्रीम साठी समावेश करून यासह महसूल मंडळाला २५ टक्के अग्रीम तात्काळ मंजूर करावा व २५ टक्के अग्रीमसाठी २१ दिवसाची अट रद्द करून पावसाचा १५ दिवसाचा खंड ग्राहय धरण्यात यावा.तसेच
तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, मंडळधिकारी, यांनी सज्जावर हजर राहवे, गाव निहाय पर्जन्यमापक बसवण्यात यावे. सन २०२२-२०२३ चा राहिलेला विमा तात्काळ देण्यात यावा .
अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आंदोलन करु असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तहसील कार्यालयास निवेदन देऊन दिले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे, संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर मिसाळ, संभाजी ब्रिगेडचे धारूर तालुका अध्यक्ष रमेश मोरे, संभाजी ब्रिगेडचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष केशव टेहरे, दादासाहेब चव्हाण, रामदास सोगे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.