भाजीपाला, फळ विक्रेत्यांसह किरकोळ व्यावसायिकांना मोंढ्यामध्ये नियमावली लावून विक्रीसाठी बसू द्या

0 36

भाजीपाला, फळ विक्रेत्यांसह किरकोळ व्यावसायिकांना मोंढ्यामध्ये नियमावली लावून विक्रीसाठी बसू द्या

– कृ.उ.बाजार समिती, नगरपरिषद, तहसील कार्यालय यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निवेदनाद्वारे मागणी

 

परळी (वार्ताहर) : परळी शहरातील मागच्या काही महिन्यापूर्वी घरणीकर रोडवरील किरकोळ भाजीपाला विक्रेते यांना बाजार समितीच्या 499 या जागेत स्थलांतरित केले व मागच्या आठवड्यात फळ विक्रेते, मसाला विक्रेते, चर्मकार बांधव यांसह छोटे छोटे किरकोळ विक्रेते यांना मोंढ्यातून 499 या जागेत स्थलांतरित केले. पण या लोकांच्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम झाला असून या व्यावसायिकासह मोंढ्यातील इतर व्यावसायिकांच्या उलाढालीवर पण मोठा परिणाम झाला आहे.मार्केट सुरळीत होण्यासाठी व लोकांची गैरसोय होणार नाही यासाठी छोट्या – छोट्या व्यापाऱ्यांना कुठला त्रास होणार नाही. यांना सध्या 499 या जागेत बसवल आहे पण त्या जागेमध्ये पाहिजे तशी सुविधा दिलेली नाही. तसेच या लोकांची मागणी आहे की आम्हाला या जागेत नको तर मोंढ्यामध्ये विक्रीसाठी परवानगी द्यावी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमची मागणी अशी आहे की बाजार समितीच्या बाजूला हनुमान मंदिराच्या पाठीमागे किंवा पुढे मार्किंग टाकून त्या लोकांना विक्रीसाठी परवानगी द्यावी. जेणेकरून कोणाचीही गैरसोय होणार नाही. रहदारीला अडचण होणार नाही आणि ग्रामीण भागातून आलेले लोक, शहरातून आलेले लोक यांना एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळतील. यामुळे शहरातल्या अनेक समस्या सुटतील यासाठी 499 मध्ये विक्रीसाठी नेलेल्या फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते व मसाले विक्रेते, चर्मकार बांधव या सर्वांना मोंढ्यामध्येच विक्रीसाठी बसवावे. अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपणास विनंती आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण असे न केल्यास समस्त किरकोळ विक्रेते व परळीकरांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. या आंदोलन दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील याची नोंद घ्यावी. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बबन भाऊ गीते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, शहराध्यक्ष ॲड जीवनराव देशमुख ,युवक तालुकाध्यक्ष शंकर शेजुळ, शहर कार्याध्यक्ष महबूब कुरेशी, तालुका उपाध्यक्ष भागवत गीते, शहर युवकाध्यक्ष सय्यद फिरोज या पदाधिकाऱ्यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपरिषद परळी वै, तहसीलदार तहसील कार्यालय परळी वै यांना निवेदन देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.