एक राखी संविधानासाठी – संविधानाची मूल्य जपण्यासाठी कलाकार कट्ट्यावर रक्षाबंधन साजरा

0 60

एक राखी संविधानासाठी
– संविधानाची मूल्य जपण्यासाठी कलाकार कट्ट्यावर रक्षाबंधन साजरा

पुणे : आम्ही भारताचे लोक… या शब्दांनी सुरु होणारे भारतीय संविधान भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या अधिकाराचे रक्षण करते, आणि त्याला विकासाची समान संधी देते. आजची परिस्थिती पाहता देशाची लूट अधिक वेगाने करता यावी यासाठी संविधान बदलण्याची भाषा बोलायला सत्ताधार्‍यांनी सुरुवात केली आहे.देशातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, बँका, एलआयसी, रेल्वे कवडीमोल भावात देशी-विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांना विकून टाकण्यात येत आहेत.
अशा परिस्थितीत आम्हा संविधान प्रेमी नागरिकांना वाटत की संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी ही आपली आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस एडवोकेट अभय छाजेड यांनी केले. निमीत्त होतं इंडिया फ्रंट आयोजित एक राखी संविधानाची या कलाकार कट्ट्यावरील कार्यक्रमाची. लोकायातच्या समन्वयिका अलका जोशी म्हणाल्या की, रक्षाबंधनाला आपल्या रक्षणकर्त्या संविधानाला राखी बांधून त्याचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेऊया आणि खर्‍या अर्थाने देशप्रेमी बनूया. भावा बहिणीच्या नात्यापलीकडील संविधानाशी आपलं नातं सुद्धा आपलं जपलं पाहिजे असं पुढे त्या म्हणाल्या. संविधान लोकशाही धर्मनिरपेक्षता जिंदाबाद, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सिख इसाई हम सब बहने हम सभ भाई या घोषणा यावेळी घेण्यात आल्या तसेच साने गुरुजींचा खरा तो एकची धर्म गाणं यावेळी घेण्यात आलं.
या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमावेळी, मी समाजात एकता-बंधुता-प्रेम पसरवण्यासाठी पुढाकार घेईन. समाजात द्वेष पसरवणाऱ्या राजकारणाचा आणि प्रसारमाध्यमांचा विरोध करेन अशी प्रतिज्ञा सर्व उपस्थितांनी घेतली. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय मोरे, लोकायतचे नीरज जैन, मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष सचिन आडेकर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी संविधानातील मूल्यांच्या उदाहरण स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षता समता बंधुता अशा प्रतीकात्मक राख्या संविधानाला बांधल्या व एकमेकांनाही बांधून रक्षाबंधन साजरा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.