आजच्या पळवा-पळवी जातीवादी घाणेरड्या राजकारणाला पर्याय म्हणजे ‘संभाजी ब्रिगेड’- गणेश सुर्वे

0 120

आजच्या पळवा-पळवी जातीवादी घाणेरड्या राजकारणाला पर्याय म्हणजे ‘संभाजी ब्रिगेड’- गणेश सुर्वे

 

मंगरुळपीर : मंगरुळपीर येथील विश्रामगृहात रविवार दि.२७ रोजी संभाजी ब्रिगेडची ‘तालुका आढावा बैठक’ मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी अनेक युवकांनी संभाजी ब्रिगेड पक्षात जाहीर प्रवेश केला.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेड वाशिमचे जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजाननदादा भोयर,संभाजी ब्रिगेड वाशिमचे जिल्हा महासचिव मा.शेख इसाक, जिल्हा कार्याध्यक्ष मा.रमेश मुंजे, जिल्हा प्रवक्ता मा.विकास देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष मा.श्रीकृष्ण शिंदे, तालुकाध्यक्ष अजय गवारगुरु, विधानसभा अध्यक्ष नयन कऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते.या बैठकीत तालुका व शहर कार्यकारणी गठीत करणे,’गाव तिथे शाखे’ चे नियोजन, आगामी निवडणूकांबाबत चर्चा, संघटना/पक्षाची पुढील वाटचाल व आगामी काळात करावयाची कामे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी गजानन भोयर आपल्या भाषणात म्हणाले की, २०१६ मध्ये संभाजी ब्रिगेडने राजकारणात प्रवेश केला असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेडची युती आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता जनतेचा आता कोणत्याही पक्षावर विश्वास राहला नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाच्या फोडाफोडीचे गलिच्छ राजकारण करुन सत्तेत बसलेल्या राजकीय नेत्यांनी जनतेच्या समस्या व प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. राजकारण हे समाजाच्या हितासाठी असते परंतु सध्याचे राजकारण फक्त वैयक्तिक स्वार्थ व पैशासाठी सुरु आहे, असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर आजच्या पळवा-पळवी जातीवादी घाणेरड्या राजकारणाला पर्याय म्हणजे संभाजी ब्रिगेड आहे, असे मत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष अजय गवारगुरु यांनी तर आभार गणेश चिपडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता देवेंद्र खिराडे, दादाराव अव्हाळे, अमर भगत, गजानन व्यवहारे, अक्षय ठाकरे, श्रीकृष्ण भरदुक, शुभम बोबडे, गणेश चिपडे, योगेश सुडके, योगेश गांजरे, प्रकाश मिसाळ, हरीश गव्हाणे, धीरज महल्ले, शिवाजी गजभार, योगेश ठाकरे, अजय वाणी, अनिकेत जामकर, अविनाश इंगोले, गोविंदा गहुले, शरद भगत, मयूर काळे, गोविंदा लांडकर, रुपेश डहाणे, सचिन मनवर, देवेंद्र धोटे, ऋषिकेश सारस्कर, ओम जाधव, सोहम राठोड, सुनील गव्हाणे, अमोल जाधव, प्रकाश भोयर आदींनी पुढाकार घेतला होता, यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.