स्वत धान्य दुकानदाराच्या हुकुमशाही उन्मादामुळे वाडीकर हैराण – खामगाव तहशिलची प्रशासनाची डोळेझाक

0 90

स्वत धान्य दुकानदाराच्या हुकुमशाही उन्मादामुळे वाडीकर हैराण
– खामगाव तहशिलची प्रशासनाची डोळेझाक

 

खामगाव (नंदकिशोर भारसाकळे): तालुक्यातील विकासाच्या नावाने शून्य असलेल गाव म्हणजे वाडी. या गावातील राशन दुकानदार विक्रेते माफिया डॉन होताना दिसत आहेत. गावातील दुकानदार १९८० पासून एकहाती सत्ता काबीज करून हुकुमशाही करणा-या राशन दुकान दुकानदार माफिया राज करत असल्याचे गावक-याचे म्हणणे आहे. गावातील राशन दुकानदारांच्या दुकानावर अनेकवेळा धाडी पडला आहेत, मात्र तरीही या दुकानदारांचा जळालेल्या सुंभाप्रमाणे असलेला पिळ निघत नसल्याचे गावातील लोक चर्चा करत असताना म्हणतात. लाॅकडाऊन काळात गावातील एका दुकानावर धाड पडून लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याने राशन विक्रेते गाव सोडून फरार झाले होते. या काळात हे दुकान गावातील इतर व्यक्तीमार्फत चालवून त्यांचेच खिस्से गरम केल्याची चर्चा लाॅकडाऊनमध्ये सुरू होती.

यावेळी गावातील काही मोजक्या जागृत राशन कार्डधारकांनी मा. तहसीलदार यांना निवेदने देऊन राशन दुकानदारांच्या हुकुमशाही व मनमानी कारभारावर लक्ष द्यावे अशी मागणी केली. मात्र जागृत नागरिकांनी दिलेल्या निवेदनाला तहशिल कार्यालयाने केराची टोपली दाखवल्याने पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाल्याने राशन कार्डधारकांना हुकुमशाहीत मुजरे करण्याची वेळ आली‌. यामुळे या हुकमशाहीला नेमके कोण पाठिशी घालत आहे असा प्रश्न गावकऱ्यांसमोर पडल्याचे गावक-याची ग्रामोन्नतीच्या प्रतिनिधींशी बोलताना आपली व्यथा मांडताना म्हटले.

देशातील नागरिकांना हक्काचे व अल्पदरात अन्नधान्य मिळावे यासाठी राशन दुकानातून देण्याची व्यवस्था सरकार चालवत आहे. मात्र वाडी गावातील राशन दुकानदार राशन दुकान हे प्रत्येक महिन्याच्या शेवटी उघडत असल्याने गावातील नागरिक दररोज बंद दाराला बघून परत फिरताना दिसत आहेत. राशन आल्यानंतर या राशन विक्रेत्यांकडून गावातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची सूचना दिली जात नसल्याने अनेक कार्डधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या राशन दुकानातून जर कार्डधारकांना राशन दिले तर त्याची कोणत्याही प्रकारची पावती या दुकानातून दिली जात नसून हस्तलिखित चिठ्ठी दिली जातो, यामुळे आपल्याला राशन किती मिळते या मेळ गावकऱ्यांना आजपर्यंत बसला नाही, तरीही हुकुमशाहीमुळे पक्की पावती मागण्याची हिंमत गावकरी करत नाहीत हे वाडी गावचे विशेष आहे.

गावातील काही जागृत कार्डधारकांनी राशन दुकानदार धान्य घेतल्याची आॅनलाईन पावती देत नसल्याची तक्रार वाडी ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य यांच्याकडे केल्यानंतर ते केवळ ग्रामस्थांची समस्या ऐकून घेतात मात्र त्या समस्येचे निराकरण करत नसल्याने ग्रामस्थांच्या पदरी निराशाच पडत आहे.
वाडी गावातील नागरिकांमध्ये जी चर्चा आहे ती ऐकून तर आख्या महाराष्ट्राच्या राशन दुकानांच नेमके काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. कारण या गावातील राशन दुकानदारांच्या तांदळाच्या ट्रकच्या ट्रक रस्त्याने धावत असून आपला ट्रक पकडण्याची कोणाच्यात धमक नाही असे राशन विक्रेते बोलतात असं गावकरी सांगत आहेत. या अशा बेताल बेफाम आणि हुकुमशाही गाजवणाऱ्या व राशन दुकानदारांवर शासन प्रशाशन कोणती कारवाई करेल का सवाल नागरिक विचारताना दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.