बीड जिल्ह्यात जलजीवन मध्ये महाघोटाळा – पाठक यांचा दणका ! जल जीवन चा मास्टरमाइंड भेंडेकर सस्पेंड !!

0 134

बीड जिल्ह्यात जलजीवन मध्ये महाघोटाळा

– पाठक यांचा दणका ! जल जीवन चा मास्टरमाइंड भेंडेकर सस्पेंड !!

बीड (विवेक कुचेकर) : तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्यासोबत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारा आणि जलजीवन योजनेचा बट्ट्याबोळ करण्यासाठीचा मास्टरमाइंड असणारा ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ सहाय्यक एपी भेंडेकर यांच्यावर नूतन सीईओ अविनाश पाठक यांनी निलंबनाची कारवाई करत दणका दिला आहे पवारांची बदली झाल्यानंतर नामदेव उबाळे असो की भेंडेकर या बगल बच्छावर कारवाईस सुरुवात झाली आहे

बीड जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जलजीवन मिशन योजनेचा तत्कालीन सी ओ अजित पवार नामदेव उबाळे आणि राव वीर या मारलाड यासह ग्रामीण पाणी पुरवठ्यातील कर्मचाऱ्यांनी अक्षरशः बट्ट्याबोळ केला जवळपास चौदाशे कोटी रुपये खर्च करून बाराशे पेक्षा अधिक गावात कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची योजना या माध्यमातून केली जाणार होती

मात्र अजित पवार आणि त्यांच्या बगल बच्चांनी या योजनेत मध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला अक्षरशः ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने इस्टिमेट तयार करून शासनाच्या पैशाचा गैरव्यवहार केला गेला यामध्ये आघाडीवर होते ते नामदेव उबाळे अजित पवार आणि कनिष्ठ सहाय्यक एपी भेंडेकर

दरम्यान सी ओ अजित पवार यांची बदली झाल्यानंतर गेल्या महिन्याभरापासून नामदेव उबाळे गायब असून भेंडेकर यांच्यावर नूतन सीईओ अविनाश पाठक यांनी निलंबनाची कारवाई केली आहे पाठक यांनी जॉईन झाल्यापासून जलजीवन मिशनमध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यामुळेच त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी काही गुत्तेदारांनी बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडे तक्रारही केली होती दरम्यान पाठक यांनी भेंडेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करून जलजीवन मध्ये भ्रष्ट कारभार करणाऱ्यांना धोक्याचा इशारा दिला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.