इमारतीला लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू – माहिती मिळताच अग्निशमन दलाचा ताफा हजर

1 40

इमारतीला लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू
– माहिती मिळताच अग्निशमन दलाचा ताफा हजर

लातूर : लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ शिवाजी लोंढे यांची व्यवसायिक व निवासी शिवाई नावाची इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर देशमुख यांचे फुलविक्री व मंडप डेकोरेशनचे दुकान आहे. या दुकानात शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागल्याची घटना गुरूवार दि़ २६ आॅक्टोबर रोजी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली़ या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा ताफा हजर होत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले़ या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत.
काही क्षणांतच या आगीने उग्र रुप धारण केले आणि ही आग वरील दोन्ही मजल्यावर पोहचली. इमारतीमधून आगीचे आणि धुराचे लोट उठले. अशा परिस्थितीत काही वेळातच या इमारतीच्या दुस‍ºया मजल्यावर राहणारे शिवाजी लोंढे यांच्या कुटुंबियांना आग आणि धुराने लपेटले. या आगीत त्यांची पत्नी कुसुमबाई शिवाजी लोंढे (वय ८० वर्ष), मुलगा सुनिल शिवाजी लोंढे (वय ५८ वर्ष) आणि सून प्रेमिला सुनिल लोंढे (वय ५०) वर्ष यांचा या आगीत गुदमरून होरपळून मृत्यू झाला.
याच इमारती राहत असलेल्या बीड येथील रहिवासी आणि लातूरमध्ये मेडिकलचे शिक्षण घेत असलेली कु. अजरा अजिज सय्यद (वय २२) तिची आई जिनत फातेमा व भाऊ फहाद यांना आगीचे चटके बसून जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या, वैद्यकीय पथक व पोलीस प्रशासन तातडीने दाखल झाले. अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिक्षक भागवत फुंदे, छञपती शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर घटनास्थळी हजर झाले.
अग्निशमन दलाचे जवान बळिराम कांबळे, चंदु जाधव, आनंद शिंदे, ज्ञानेश्‍वर मगर, चंद्रकांत कोमडे, राधाकिशन कासले, मोसिन शेख, सोहेल शेख, सतिश खटाळ, प्रितम कांबळे, बसवराज स्वामी यांनी शथीर्चे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत काळाने लोंढे कुटुंबियांवर झडप घातली होती. या घटनेने लातूर शहरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा शिवाजी नगर पोलीस पंचनामा करत आहेत.

1 Comment
  1. Justin McCarty says

    Hello,

    Wondering if you accept guest posts or link inserts on existing posts on gramonnatti.com?

    How much would you charge for this?

    Justin

Leave A Reply

Your email address will not be published.